शहरं
Join us  
Trending Stories
1
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
2
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
3
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
4
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
5
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
6
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
7
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
8
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
9
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
10
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
11
"पुतिन यांनी युक्रेनला 'टेस्टिंग ग्राउंड' बनवलं", रशियन मिसाइल हल्ल्यावरून झेलेन्स्की भडकले
12
ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन
13
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
14
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा
15
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
16
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
17
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
18
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
19
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
20
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवारांसोबत गेले तर...? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!

Mumbai-Goa highway Traffic मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचे विघ्न! कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 11:22 AM

Mumbai Goa highway Traffic शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

मुंबई : कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी मुंबईतील चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात दाखल होत असतात. यंदाही गणेशोत्सव सणासाठी अवघे काही तास शिल्लक असल्यानं मुंबईतील चाकरमानी कोकणात आपापल्या गावी जात आहेत. मात्र, त्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे, सुकेळी खिंड, लोणेरे परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. आज सकाळपासून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसमोर विघ्नच विघ्न येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तसेच, मुंबई-गोवा महामार्गावर रिमझिम पावसाच्या सरी कोसळत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वाहने सावकाश चालवण्याच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या आहेत. 

मंगळवारपासूनच कोकणाच्या दिशेनं जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आणि गुरुवारी रात्रीपासून हा ओघ आणखी वाढला. या गणेशभक्त एसटी बस, खासगी वाहनं आणि चारचाकी गाड्यांपासून दूचाकीपर्यंत शक्य त्या सर्व वाहनांचा वापर करत कोकणात निघाले आहेत. असे असले तरी त्यांच्यापुढे असणारं वाहतूक कोंडीचे विघ्न मात्र काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. कासवगतीने वाहने पुढे सरकरत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनाही मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरही वाहनांच्या लांबच लांब रांगापुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर देखील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. गणेशोत्सवासाठी मुंबई आणि आसपासच्या परिसरातून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. बोरघाट पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईहून येणाऱ्या आणि पुण्याहून जाणाऱ्या दोनही लेनवरून वाहतूक सुरू करून कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. 

टॅग्स :highwayमहामार्गGanesh Mahotsavगणेशोत्सवMumbaiमुंबईMumbai-Pune Express Wayमुंबई-पुणे एक्सप्रेस वे