मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे विधान भवन मार्गावर मादाम कामा रोड जंक्शनपासून ते युनियन बँक प्रवेशद्वारापर्यंतचा मार्ग फायर ब्रिगेड, पोलीस व अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त इतर वाहनांना वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. तसेच विधान भवन मार्गावर युनियन बँकेच्या पश्चिम प्रवेशद्वारापासून रामनाथ गोयंका मार्गापर्यंत दोन्ही बाजूंनी फायर ब्रिगेड, पोलीस व अॅम्ब्युलन्सव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. अधिवेशन कालावधी संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे पोलीस उप आयुक्त (शहरे) वाहतूक शाखा मुंबई यांनी प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.
विधान भवन मार्गावर वाहतुकीस प्रतिबंध
By admin | Published: July 17, 2015 12:12 AM