पुणे : वाहतूकदारांनी पुकारलेला बेमुदत बंद शनिवारी मागे घेण्यात आला. केंद्राने वाहतूकदारांच्या मागण्या मान्य केल्याने बंद मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि वित्त मंत्रालयातील अधिकारी आणि वाहतूक संघटनांमध्ये शनिवारी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बंद मागे घेण्यात आला. नवी दिल्ली येथे ही बैठक झाली. बैठकीत थर्ड पार्टी इन्शुअरन्समध्ये प्रस्तावित ५० टक्के दर वाढ २७ टक्के करण्याचे आश्वासन देण्यात आले; तसेच परिवहन शुल्कवाढ व टोलसंबंधातील प्रश्नांसाठी वाहतूक संघटना, तसेच शासनाच्या वतीने एक समिती तयार करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)या प्रश्नांबाबत शनिवारी राज्यातील वाहतूकदारांची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत मागण्यांवर पुनर्विचार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला होता; मात्र मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
वाहतूकदारांचा बेमुदत बंद मागे
By admin | Published: April 09, 2017 4:38 AM