शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

पुणे-नगरची कोंडी सोडविण्यासाठी ट्रॅफिकप्लॅन : विश्वास नांगरे-पाटील

By admin | Published: April 07, 2017 1:04 AM

पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याचा सर्व्हे करून ‘ट्रॅफिक प्लॅन’ करण्यात येणार आहे.

कोरेगाव भीमा/शिक्रापूर : पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रस्त्याचा सर्व्हे करून ‘ट्रॅफिक प्लॅन’ करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक विषयातील तज्ज्ञ प्रताप भोसले यांची मदत घेतली जाईल, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली. शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १६ गुन्हेगारांवर तडीपारीचा प्रस्ताव सादर केला आहे. कॉलेजबाहेर बुलेटचा आवाज काढून मुलींना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. शिक्रापूर पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी व आय जी शंभर या ग्रुपमधील सदस्यांची बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनीक हरगुडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, पंचायत समिती सदस्या सविता पऱ्हाड, माजी सदस्या दीपाली शेळके, सणसवाडीच्या सरपमच वर्षा कानडे, कोरेगाव भीमाच्या सरपंच अनिता भालेराव, सणसवाडीचे उपसरपंच बाबासाहेब दरेकर, जिजामाता बँकेचे संचालक पंडित दरेकर, ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष रमेश टाकळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या वेळी विश्वास नांगरे-पाटील यांनी पुणे-नगर महामार्गावरील वाहतुकीस कारणीभूत असणाऱ्या दुचाकी-चारचाकी उचलून पोलीस ठाण्यात नेण्यासाठी क्रेनच्या निविदा मागविण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या. रस्तादुभाजक तोडल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. परिसरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व चोऱ्यांसह वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सीसीटीव्ही बसवून त्याची लिंक पोलीस ठाण्याला बसविण्याची सूचना करण्यात आली. प्रत्येक नागरिकाची सुरक्षेची जबाबदारी आमची आहेच. महामार्गावर, प्रत्येक गावात, महाविद्यालय परिसरात, प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभे राहणे गरजेचे आहे. ९८ टक्के सुजाण नागरिकांचा सपोर्ट ग्रुप आमच्या आमच्या पाठीशी राहिला तर पोलिसांचे काम सक्षम होईल, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे पोलीस अधीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी केले.खासगी वेशातील पोलीस तयार कराशिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर औद्योगिकीकरण झाल्याने नागरीकरणातही वाढ झाली आहे. त्याप्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ अपुरे असल्याने खासगी वेशातील पोलीस नागरिकांमधून तयार करण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांना विश्वास नांगरे यांनी सूचना दिल्या.