गोंदिया : गार्डच्या डब्यात नाग शिरल्याने यशवंतपूर-टाटानगर ही गाडी गोंदिया रेल्वेस्थानकावर तासभर थांबवावी लागली. सर्पमित्रांनी शोधमोहीम राबवूनही त्यांना साप काही आढळला नाही. त्यानंतर गाडी रवाना करण्यात आली.घटना पहिल्यांदाच हावडा-मुंबई मार्गावरील मंगळवारी दुपारी घडली. या प्रकारामुळे रेल्वेस्थानकावर काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.यशवंतपूर-टाटानगर गाडी सोमवारी बेंगळुरू रेल्वे स्थानकावरुन सकाळी साडेआठ वाजता सुटली. त्याचवेळी गार्डच्या डब्यात नाग असल्याचे चालक एस. वाय. माहुलकर यांना आढळले. मात्र, काही क्षणातच तो दिसेनासा झाला. त्यामुळे त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मंगळवारी ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर माहुलकर यांनी पुन्हा पाहणी केली. तेव्हा कागदांच्या बंडलवर नाग बसल्याचे त्यांना दिसले. मात्र गाडी नागपूरला अधिक वेळ थांबविणे शक्य नसल्यामुळे वेळ न घालविता त्यांनी गोंदिया रेल्वेस्थानकावर गाडी थांबवण्याचा निर्णय घेतला. सुरक्षेचा उपाय म्हणून गार्डच्या डब्याला लागून असलेला डबा देखील रिकामा केला. सर्पमित्र बंटी शर्मा आणि रेल्वेच्या कर्मचाºयांनी डब्यात जाऊन पाहणी केली; मात्र त्यांना साप आढळला नाही़
सापाने तासभर थांबविली रेल्वे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 4:08 AM