मुंबई : जात पंचायतींच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी जिल्हा पातळीवर मोहोल्ला कमिटी स्थापन करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी राज्य शासनाला दिले़ न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ दंगलीनंतर समन्वय व शांततेसाठी प्रत्येक विभागात मोहोल्ला कमिटी स्थापन करण्यात आली़ त्याधर्तीवर जात पंचायतींना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर अशा कमिटी स्थापन करणे गरजेचे आहे. कारण पोलीस अधिकाऱ्यांचे हात राजकीय व मंत्रालयातून बांधलेले आहेत़ त्यामुळे एका त्रयस्त संस्थेकडूनच याला निर्बंध बसू शकतात, असे मतही न्यायालयाने यावेळी व्यक्त केले़ श्रीवर्धन येथील संतोष कृष्णा जाधव व इतरांना त्यांच्या पंचायतने वाळीत टाकले होते़ याविरोधात जाधव यांनी पोलिसांत गुन्हा नोंदवला़ सामाजिक अपात्रता या विशेष कायद्याअंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता़ मात्र राज्य शासनाच्या कायद्याची अधिसूचना जारी झाली नसल्याने सत्र न्यायालयाने यातील आरोपींना दोषमुक्त केले़ त्यानंतर जाधव यांनी अॅड़ असिम सरोदे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ (प्रतिनिधी)
जात पंचायतीवर मोहोल्ला कमिटीचा उतारा
By admin | Published: December 24, 2014 2:38 AM