मुंबई - राज्य सरकारकडून सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रविण परदेशी, रणजीत कुमार यांचाही समावेश आहे. प्रवीण परदेशी (Praveen Pardeshi), आयएएस (1985) यांना अतिरिक्त मुख्य सचिव, मराठी भाषा विभाग, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले आहे. तर आयटी विभागाचे संचालक असलेले रणजीत कुमार (Ranjit Kumar), आयएएस (2008) यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे व्ही. पी फड (V.P.Phad), आयएएस (MH:2011) यांची मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या सचिव सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भिवंडी-निजामपूर महापालिकेचे डॉ. पंकज अशिया (Pankaj Ashiya), आयएएस (MH:2016) यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच राहुल गुप्ता (Rahul Gupta), आयएएस (MH:2017) सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, अहेरी, गडचिरोली यांना उस्मानाबादच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. येथे नियुक्त केले आहे. मनुज जिंदल (Manuj Jindal), आयएएस (MH:2017) सहाय्यक जिल्हाधिकारी, अटपाली उपविभाग आणि प्रकल्प अधिकारी, आयटीडीपी, भामरागड, गडचिरोली यांची जालना जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मिताली सेठी (Mitali Sethi), आयएएस (MH:2017) यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.