मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषानुसार बदल्या करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राज्य पोलीस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ४३ सहायक आयुक्त/उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. गृहविभागाकडून बुधवारी बदल्यांचे आदेश काढण्यात आले.निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार कार्यकाळ पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याचे अधिकाºयांकडून सांगण्यात आले. बदली झालेल्या काही अधिकाºयांची नावे अशी (कंसात कोठून-कोठे) : सुरेश पाटील (बोईसर - रत्नागिरी), जयंत बजबळे (विरार - दहशतवादी विरोधी पथक), डॉ. शीतल जानवे (चिपळूण- राज्य गुप्तवार्ता विभाग), राजेंद्र रायसर्गे (फैजपूर जळगांव-सिल्लोड औरंगाबाद ग्रामीण), केशव पातोंड (पाचोरा - उपअधीक्षक - मुख्यालय, जळगाव), नजीर रेहमान शेख (चाळीसगांव-औरंगाबाद ग्रामीण), सूरज गुरव (करवीर कोल्हापूर-चिपळूण, रत्नागिरी), प्रेरिता कट्टे (सातारा ग्रामीण- करवीर,कोल्हापूर), गंगाधर अणनके (जत -लोणावळा), अनिल पवार (मिरज-ठाणे शहर), दिलीप जगदाळे (मंगळवेढा -जत), सुहास गरुड (हवेली- सातारा ग्रामीण), संजय पुज्जलवार (उमरखेड - नागपूर ग्रामीण), अशोक आमले (औरंगाबाद ग्रामीण-बीड), सुधाकर रेड्डी (गंगाखेंड-सांगली), रेणुका बागडे (सेलू- पालघर).
राज्यातील ४३ सहायक आयुक्त, उपअधीक्षकांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:50 AM