शहरं
Join us  
Trending Stories
1
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
4
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
5
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
6
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...
8
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
9
राज‘पुत्रा’च्या उमेदवारीने माहीमची लढत रंगतदार
10
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
11
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
12
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
13
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
14
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
15
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
16
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
17
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
18
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
20
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...

आरटीओतून परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’

By admin | Published: December 07, 2014 12:24 AM

एरवी तपासणीच्या नावाखाली वाहनांचा पैशासाठी दूरपर्यंत पाठलाग करणारी आरटीओची यंत्रणा सध्या चक्क आपल्याच खात्याच्या परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’ करीत आहे. हिवाळी अधिवेशन काळात

दौऱ्याचा धसका : विदर्भातील आरटीओ कार्यालये सतर्कराजेश निस्ताने - यवतमाळ एरवी तपासणीच्या नावाखाली वाहनांचा पैशासाठी दूरपर्यंत पाठलाग करणारी आरटीओची यंत्रणा सध्या चक्क आपल्याच खात्याच्या परिवहन आयुक्तांचा ‘पाठलाग’ करीत आहे. हिवाळी अधिवेशन काळात होणारा आयुक्ताचा संभाव्य दौरा हे यामागील प्रमुख कारण आहे. अन्न व औषधी प्रशासन विभाग राज्यभर गाजविणारे सनदी अधिकारी महेश झगडे आता राज्याचे परिवहन आयुक्त झाले आहेत. औषध प्रशासनातील धुमधडाका त्यांनी परिवहन खात्यातही सुरू केला आहे. पहिल्याच टप्प्यात त्यांनी मुंबई व परिसरातील प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) आपल्या निशाण्यावर घेतली. ग्राहक बनून खिडकीवर उभे राहत झगडे यांनी आरटीओत चालणाऱ्या ‘उलाढालीं’चा स्वत: अनुभव घेतला. आता झगडे यांचा मोर्चा विदर्भाकडे वळणार आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात मी विदर्भात येणार, असे झगडे यांनी आरटीओ अधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. मात्र झगडे यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते विदर्भात केव्हाही आणि कुठेही अकस्मात भेट देण्याची, ग्राहक बनून परवान्यासाठी खिडकीवर उभे राहण्याची दाट शक्यता आहे. आरटीओ यंत्रणेने याची प्रचंड धास्ती घेतली आहे. म्हणूनच आरटीओतील आर्थिक उलाढालीशी अगदी जवळचा संंबंध असलेल्या काही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता चक्क महेश झगडे यांचाच फोनवरून ‘पाठलाग’ सुरू केला आहे. यातील काही कर्मचारी थेट परिवहन आयुक्तांच्या मुंबई कार्यालयात आपल्या ‘कनेक्शन’ मधील यंत्रणेशी सातत्याने संपर्कात आहेत. महेश झगडे नेमके कुठे आहेत, त्यांचे ‘लोकेशन’ काय, हे तपासले जात आहे. झगडे यांचा संभाव्य दौरासुद्धा मिळविण्याचा प्रयत्न होत आहे. एकूणच झगडे यांच्या संभाव्य दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण विदर्भातील आरटीओ कार्यालयांमधील यंत्रणा सतर्क झाली आहे. एरवी दुपारी १२ पर्यंत खुर्चीकडे न फिरकणारे आणि सतत टपरीवर दिसणारे कर्मचारी आता नियोजित वेळेच्या १० मिनिटे आधीच स्थानापन्न होताना दिसत आहेत. साहेब स्वत:च रांगेत असू शकतात म्हणून खिडकीवरील प्रत्येक माणसाचा चेहरा पाहून त्याला वागणूक दिली जात आहे. चांगल्या कपड्यात दिसणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेणे टाळले जात आहे. झगडे यांच्या दौऱ्याच्या भीतीने आरटीओतील आर्थिक उलाढाल नियंत्रणात आहेत. मात्र काही ‘दीर्घ अनुभवी’ कर्मचारी परिवहन आयुक्तांच्या दौऱ्याच्या सावटातही आपला ‘वाटा’ सोडण्यास तयार नाहीत. सजग राहून रिस्क घेऊन हे कर्मचारी आपली ‘उलाढाल’ चालूच ठेवत आहेत. यावरून हे कर्मचारी किती ‘पट्टी’चे असावे याचा अंदाज येतो. परिवहन आयुक्तांच्या कामाच्या वेगळ्या पॅटर्नमुळे आर्थिक उलाढालीची सवय झालेल्या आरटीओतील संबंधित यंत्रणेचा सध्या पैशाविना जीव कासावीस होतो आहे. झगडे कुणाला जुमानतही नाहीत आणि मुदतपूर्व त्यांची बदलीही कुणी करू शकत नाहीत, याचा अंदाज आल्यानेच अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आता त्यांच्या सेवानिवृत्तीवर लक्ष केंद्रीत केले आहे. कुणी त्यांचे सहा महिने राहिल्याचे सांगत आहे तर कुणी ते फेब्रुवारीमध्ये सेवानिवृत्त होणार असल्याचे बोलतो आहे. यावरून झगडे यांच्या सेवानिवृत्तीपर्यंत टाईमपास करायचा आणि ते निवृत्त होताच पुन्हा वाहनधारकांना एजंटांच्या माध्यमातून लुटण्याचा गोरखधंदा सुरू करायचा, अशी या यंत्रणेची मानसिकता स्पष्ट होते.