मुंबई : एसटीचे प्रवासी उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्तरांवर उपाययोजना करण्याचे निर्देश परिवहनमंत्री अनिल परब यांनी महामंडळ अधिकाऱ्यांना दिले. ‘उत्पन्न वाढवा’ या विशेष अभियानांतर्गत मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाऱ्या आगारांना दरमहा दोन लाख रुपये बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.‘उत्पन्न वाढवा’ या अभियानांतर्गत निकृष्ट कामगिरी करणाºया आगारातील जबाबदार अधिकाºयांना शिक्षेस सामोरे जावे लागेल. हे अभियान १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी राबवण्यात येईल.एसटीच्या २५० आगारांची प्रदेशनिहाय विभागणी होईल. उत्पन्नात मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक उत्पन्न आणणाºया प्रथम क्रमांकाच्या आगारास दरमहा दोन लाख रुपये, द्वितीय आगारास दीड लाख, तृतीय आगारास एक लाखाचे बक्षीस मिळेल. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाºया विभागांना प्रथम क्रमांक दोन लाख रुपये, द्वितीय दीड लाख, तृतीय क्रमांक एक लाख २५ हजाराचे बक्षीस देण्यात येईल.
सर्वाधिक उत्पन्न वाढविणाऱ्या आगारांना मिळणार दोन लाखांचे बक्षीस - परिवहनमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 4:14 AM