शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
2
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
3
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
4
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
5
"माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
6
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक
7
...तर ५० उमेदवार उभे केले असते, समाजाचे योगदान वाया जाऊ देणार नाही; मनोज जरांगेंचे सूचक भाष्य
8
शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 
9
Maharashtra Election 2024: सरकार आल्यास मविआ कोणासाठी काय करणार? ठाकरेंनी सांगून टाकलं
10
Eknath Shinde : "....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार"; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं
11
लोकसभा निवडणुकीत भुजबळांकडून राजाभाऊ वाजेंना मदत?; हेमंत गोडसेंनी शिवसैनिकांसमोर केला गंभीर आरोप!
12
सुशांतची आत्महत्या नाही तर हत्या! सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचा खळबळजनक दावा, म्हणते, डॉक्टरांनी बदलले पोस्टमोर्टम रिपोर्ट
13
ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
14
उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!
15
मानखुर्दमध्ये अबु आझमींची ठाकरे गटाच्या शाखेला भेट; ठाकरेंचे शिवसैनिक करणार प्रचार
16
Parliament Winter Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर पर्यंत चालणार; केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली
17
ट्रम्प जिंको अथवा हॅरीस...; अमेरिकेच्या राष्ट्रपतीला किती मिळणार सॅलरी? सोबतच या खास सुख-सुविधाही मिळणार
18
“जयश्री पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवार, यांनाच निवडून द्या”; विशाल पाटील यांचे आवाहन
19
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं

राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 6:52 AM

महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो

- वसंत भोसले कोल्हापूर : महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये कच-याचे डोंगर तयार होत असून, सत्तावीस महापालिकांच्या क्षेत्रात दररोज १९ हजार टनांहून अधिक टन घनकचरा गोळा होतो, पण त्यापैकी अर्ध्यापेक्षा कमी कच-यावरच प्रक्रिया होत असल्याचे भयावह वास्तव ‘लोकमत’च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.राज्यातील सर्व २७ महापालिका क्षेत्रांत गोळा होणा-या घनकच-यासंबंधी सर्वेक्षण केले गेले. त्यानुसार, महाराष्ट्रात मात्र दररोज तयार होणाºया १९ हजार ४२० टन कच-यापैकी केवळ ७ हजार २६२ टन कच-यावर प्रक्रिया होते. कचरा गोळा करून डम्पिंग करण्यासाठी वर्षाला ३ हजार ५४२ कोटी रुपये खर्च होतात. २७ पैकी ११ महापालिका क्षेत्रात गोळा होणा-या कच-यावर अजिबातच प्रक्रियाच होत नाही. सहा महापालिकांचा प्रक्रिया करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. फक्त मालेगाव महापालिकेला वर्षाला केवळ वीस लाख रुपये उत्पन्न मिळत आहे. उर्वरित एकाही महापालिकेला कचºयावरील प्रक्रियेतून एक पैशाचेही उत्पन्न मिळत नाही.मुंबई महापालिका दररोज गोळा होणाºया ७,४२५ टन कचºयापैकी ३,८०० टन कचºयावर प्रक्रिया करते, असा प्रशासनाचा दावा आहे. या प्रक्रियेतून मिळणारे उत्पन्न त्यासाठीच्या प्रक्रिया खर्चापोटी संबंधित कंपनीला दिले जाते. महापालिकेला एक पैसाही मिळत नाही. नाशिक ही एकमेव महापालिका आहे की, तिच्या क्षेत्रात निर्माण होणाºया पाचशे टन घनकºयावर पूर्ण प्रक्रिया केली जाते. पुण्यातही ५० टक्के कचºयावर प्रक्रिया होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या महानगराचे महापौर होते, त्या नागपूरमध्ये दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा गोळा होतो. मात्र, त्यापैकी केवळ १५० टनांवरच प्रक्रिया केली जाते, असे सर्वेक्षणात समोर आले आहे.>कचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव फायलीतच!स्वच्छ भारत अभियानांतर्गत महानगर, नगरपालिका आणि नगरपंचायतींनाकचरा व्यवस्थापनाचे प्रस्ताव तयार करण्यास सांगितले आहेत. तसे महापालिकांनीही तयार केले. मात्र, त्यापैकी बहुतांश महापालिकांचे प्रस्ताव कार्यालयीन फाइल्समध्येच पडून आहेत, असेही या सर्वेक्षणात स्पष्ट दिसूनआले आहे. वाढत्या शहरांबरोबर दरवर्षी कचºयाची समस्या वाढत आहे, पण त्यावर ठोस उपाय करणारी नाशिक वगळता एकाही महापालिकेचे प्रयत्न झालेले दिसत नाहीत, हेदेखील या सर्वेक्षणात आढळून आले आहे.शून्य टक्के प्रक्रिया : भिवंडी, पनवेल, वसई-विरार, औरंगाबाद, परभणी, लातूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, जळगाव आणि नगर या अकरा महापालिका क्षेत्रातील कचरा गोळा करून डंप केला जातो. यातील एक टन कचºयावरही प्रक्रिया केली जात नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न