शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

सोलापूरच्या तरूणाचा बाईकवरून कन्याकुमारी ते लेह प्रवास... पार केले ४२५६ किमी अंतर

By admin | Published: June 24, 2016 3:34 PM

सोलापूरच्या विनोद केंगनाळकर या तरुणाने कन्याकुमारी ते लेह लद्दाख असा ४२५६ किमीचा प्रवास अवघ्या १०४ तासात बाईकद्वारे पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला

सोलापूर, दि. २४ - सोलापूरच्या विनोद केंगनाळकर या तरुणाने कन्याकुमारी ते लेह लद्दाख असा ४२५६ किमीचा प्रवास अवघ्या १०४ तासात बाईकद्वारे पूर्ण करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़. आता या विक्रमांची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी प्रस्ताव पाठवला आहे़ या विक्रमापूर्वी त्याने सोलापूर ते पुणे हा प्रवास बाईकवरून अवघ्या अडीच तासात दोनदा पूर्ण केला आहे़
 खडतर प्रवास असला तरी मनात जिद्द बाळगून आत्मविश्वासाने २८ मे रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आपल्या प्रवासाला सुरुवात केली़ १४ तासात १११५ किमीचे अंतर पूर्ण करून रात्री १०़३० वाजता आंध्रप्रदेशातील कुरनूल येथे एका हॉटेलमध्ये विश्रांती घेतली़ २९ मे रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या  सुमारास कुरनूलहून त्यांचा प्रवास पुढे सुरु झाला़ नरसिंहपूर, मध्यप्रदेश येथे रात्री १० वाजता तो पोहोचला़ यादरम्यान त्याचा १२१५ किमीचा प्रवास अवघ्या १४ तासात पूर्ण झाला होता़ कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त प्रवास करून विक्रम नोंदवावयाचा ध्येय असल्याकारणाने विनोदने त्या रात्री पेट्रोल पंपावरच रात्र काढली़ पुन्हा सकाळी पाच वाजता प्रवास सुरु झाला़ हिमाचल प्रदेश, सोलन येथे रात्री ११ वाजता पोहोचला़ रात्रीच्या विश्रांतीनंतर दुसºया दिवशी ३१ तारखेला सकाळी साडेसहा वाजता प्रवासाला सुरुवात करून सायंकाळी ३़४० वाजता मनाली येथे पोहोचला़ मनाली येथे विश्रांती घेऊन आदल्या दिवशी सकाळी ५़१० वाजता लेहसाठी कूच केली़
लेहसाठी पुढील प्रवास हा फारच खडतर असा होता़ यादरम्यान रोहतांगा पात येथे सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या बाईकचा अपघात झाला़ सुदैवाने त्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही़ यादरम्यान बाईकचे रेस्ट फुट तुटून पडल्याने बाईक चालविणे हे त्याच्यासाठी कसरतीचे काम होते़ तरीदेखील धीर न सोडता त्याने पुढील प्रवासासाठी कूच केली़ यानंतर जवळपास १०० किमीच्या प्रवासानंतर मेरू येथे अतिशय कडक थंडी पडली़ यादरम्यान पायाचे मोजे निघून पडल्याने त्याला हॉपो थर्मीयाचा अटॅक आला़ खचून न जाता त्याने येथील एका टेंटमध्ये विसावा घेतला.़ जवळपास अकरा तासांनंतर प्रकृती बरी झाल्यानंतर ५़१० वाजता पुढील प्रवासाला सुरुवात केली़ ८़३० वाजता लेह लद्दाख गाठून आपली मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याचे ‘लोकमत’शी बोलताना त्याने  सांगितले.
नवनवीन विक्रम करणे हा माझा छंद आहे़ बाईक चालविणे मला खूपच आवडते़ या आवडीतूनच काहीतरी विक्रम प्रस्थापित करण्याची कल्पना मनात आली़ बाईकद्वारेचा हा छंद का भागवू नये यासाठी नवी बाईक खरेदी केली़ संपूर्ण तयारीनंतर लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी माझ्या विक्रमाची नोंद व्हावी, यासाठी कन्याकुमारी ते लेह लद्दाख हे खडतर आव्हान स्वीकारले़ ही मोहीम यशस्वीपणे राबविली आहे़ त्यामुळे लवकरच लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये आपल्या विक्रमाची नोंद होईल़
-विनोद केंगनाळकर,  हौशी बाईक रायडर
 
खडतर आव्हान होते
- खांर्दुगला टॉप हा जगातील सर्वात उंचीचा अतिशय खडतर मार्ग आहे़ समुद्रसपाटीपासून १८३८० फूट उंचीवरुन हा रस्ता जातो़ 
- असे जीवघेण्या खडतर आव्हान पूर्ण करून विनोदने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़
- सन २०१३ मध्ये अरनॉब गुप्ता या व्यवसायाने डॉक्टर असणा-या व्यक्तीने लेह  लद्दाख ते कन्याकुमारी असा बाईकवरून प्रवास करुन लिम्का बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती.