मुंबई : मुंबई ते दिल्ली दरम्यानचा रेल्वे प्रवास येत्या काही काळात १६ तासांवरुन १२ तासांत होणार आहे. रेल्वे मंत्रालयाने या दोन्ही मार्गादरम्यान प्रवासअंतर कमी करण्यासाठी वेगवान आणि सर्व सुविधांनी युक्त अशी ‘टाल्गो’ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी येत्या तीन महिन्यात मुंबई ते दिल्ली मार्गावर टाल्गो ट्रेनच्या चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. मुंबई ते अहमदाबादबरोबरच मुंबई ते दिल्ली दरम्यानही मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे प्रवास अंतर कमी करण्यासाठी बुलेट ट्रेनचे नियोजन केले जात असतानाच मुंबई ते दिल्ली दरम्यानचे प्रवास अंतरही कमी करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मुंबई ते दिल्ली दरम्यान वेगवान टाल्गो ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या हेच अंतर कापण्यासाठी राजधानी एक्सप्रेसला १६ तास लागतात. टाल्गो ट्रेनमुळे हाच प्रवास बारा तासांवर येऊन पोहोचेल,अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दिली. याआधी टाल्गो ट्रेनच्या दोन चाचण्या अन्य मार्गांवरही केल्या जाणार आहेत. यात मुरादाबाद ते बरेली आणि मथुरा ते पलवल या दोन्ही मार्गांवर ताशी १00 ते १५0 च्या वेगाने चाचणी केली जाईल. त्यानतंतर मात्र मुंबई ते दिल्ली मार्गावर साधारपणे ताशी २00 च्या वेगाने चाचणी केली जाणार आहे. ही ट्रेन नऊ डब्यांची असेल. स्पेनमधील बार्सिलोनातील कंपनीकडून टाल्गो ट्रेन भारतीय रेल्वेला उपलब्ध होईल. सुरुवातीला या ट्रेनची कोणतीही किंमत भारतीय रेल्वेला मोजावी लागणार नाही आणि चाचण्याही या विनाशुल्कच होतील.>अशी आहेत वैशिष्ट्येनऊ डब्यांची ट्रेनताशी २00 ते २२0 चा वेगअॅल्युमिनियमचे डबेअत्यंत कमी प्रमाणात व्हायब्रेट होईल. ३0 टक्के कमी ऊर्जा या ट्रेनला लागेल. आगीपासून बचाव होईल.
मुंबई ते दिल्ली प्रवास १६ तासांवरुन १२ तासांंत होणार; ‘टाल्गो’ ट्रेनची तीन महिन्यात चाचणी
By admin | Published: April 30, 2016 4:44 AM