शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

मुंंबई मेट्रोचा प्रवास दिल्ली, बंगळुरूपेक्षा महाग

By admin | Published: February 09, 2015 5:47 AM

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे

सचिन लुंगसे, मुंबईवर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गाहून धावणाऱ्या मुंबई मेट्रोचा प्रवास हा दिल्ली, बंगळुरूच्या तुलनेत महागडा असून, दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोप्रमाणे मुंबई मेट्रोलाही अनुदान मिळाले अथवा करात सवलत मिळाली तर मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.न्यायालयाने मुंबई मेट्रोच्या तिकीट दरवाढीला मंजुरी दिली आणि मुंबई मेट्रोचे भाडे १०, २०, ३० आणि ४० अशा टप्प्यात वाढले. मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोशी तुलना केली असता दिल्ली मेट्रोच्या १२ किलोमीटरच्या प्रवासाठी ८ ते १८ रुपये मोजावे लागत आहेत. आणि बंगळुरू मेट्रोच्या ६ किलो मीटर प्रवासासाठी १० ते १५ रुपये मोजावे लागत आहेत. आणि मुंबई मेट्रोचा प्रवास उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर १०, २०, ३०, ४० असा झाला आहे.मुळात दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोसाठी एक्सपोर्ट ड्युटी लागत नाही. शिवाय त्यांना अनेक कर भरावे लागत नाहीत, कस्टम ड्युटी द्यावी लागत नाही किंवा त्यात त्यांना सवलत मिळते. शिवाय दिल्ली आणि बंगळुरू मेट्रो, जी वीज वापरते त्याला अनुदान मिळते. अशा अनेक घटकांमुळे दिल्ली आणि बंगळुरू मेट्रोचे प्रवास भाडे नियंत्रणात राहते. परंतु मुंबई मेट्रोला यापैकी कोणत्याच सुविधा मिळत नाहीत. मुंबई मेट्रोला १३ टक्के व्याजदराने कर्ज मिळते, तर दिल्ली मेट्रोला १.५ व्याजदराने कर्ज मिळते. मुंबई मेट्रोसाठी जी वीज वापरली जाते, त्यासाठी १ युनिटकरिता ११ रुपये मोजावे लागतात. दिल्ली मेट्रो १ युनिटसाठी ६ रुपये मोजते. मुंबई मेट्रोला एक्सपोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी आणि उर्वरित करदेखील माफ नाहीत, विजेवर अनुदान नाही. परिणामी मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे वाढविण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सवलती मिळूनही २०१३-१४ या आर्थिक वर्षांत दिल्ली मेट्रोला १०० कोटींचा तोटा झाला होता. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या दरवाढीच्या मंजुरीआधी मुंबई मेट्रोला दिवसागणिक ८० लाखांचा तोटा होत होता आणि आजही तो आकडा तेवढ्याच घरात आहे. परिणामी मुंबई मेट्रोची दिल्ली आणि बंगळुर मेट्रोशी तुलना करताना मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे कमी होणे गरजेचे असेल, तर मुंबई मेट्रोला कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध झाले पाहिजे. तसेच विजेच्या वापरावर अनुदान मिळाले पाहिजे आणि उर्वरित करातही सवलत मिळाली पाहिजे. राज्य अथवा केंद्र सरकारने दरवाढीचा गोंधळ घालताना वरील मुद्दे लक्षात घेतले तर साहजिकच मुंबई मेट्रोचे प्रवास भाडे निम्म्याहून कमी होईल आणि मुंबईकर प्रवाशांना दिलासा मिळेल.(प्रतिनिधी)