वावोशी : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शुक्र वार-शनिवार हे दोन दिवस पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी अवजड वाहनांना जुन्या मार्गावर वळवून खालापूर फाट्यावर काही काळ थांबवण्यात येते. यालाच ‘गोल्डन अवर’ म्हणतात. मात्र, या गोल्डन अवरमुळे जुन्या मार्गावरील प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास होत आहे. त्यामुळे हा ‘गोल्डन अवर’ बंद करावा, यासाठी खालापुरातील शिवसैनिकांनी खालापूर फाट्यावर शनिवारी निषेध केला. द्रुतगती मार्गावरील प्रवास सुखकर व्हावा, यासाठी पोलिसांनी गेल्या काही महिन्यांपासून जुन्या मार्गावर ‘गोल्डन अवर’ सुरू केला आहे. मात्र, यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. या प्रकरणी शिवसैनिकांनी शनिवारी खालापूर फाट्यावर निषेध केला. तसेच आंदोलनाचा इशारा खोपोली शहरप्रमुख सुनील पाटील, माजी उप सभापदी श्याम साळवी, आदींनी वाहतूक पोलीस निरीक्षकांना दिला आहे. (वार्ताहर)
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ‘गोल्डन अवर’मुळे प्रवासी त्रस्त
By admin | Published: April 09, 2017 12:36 AM