अहमदनगर : गुगलवरील माहिती प्रादेशिक भाषेत अनुवादित होईल, अशी प्रणाली विकसित केली जात आहे. त्यातून मराठीसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये माहितीचे भांडार खुले होणार असल्याचे ‘गुगल’चे आॅनलाईन जाहिरात विक्री विभागाचे संचालक अरजित सरकेर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.‘स्रेहालय’ संस्थेच्या कार्यक्रमानिमित्त सरकेर नगरला आले आहेत. त्यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय विभागाशी संवाद साधला. ते म्हणाले, सध्या ‘लोकमत’सारखी वृत्तपत्रे आॅनलाईन संकेतस्थळांवर मराठीतून माहिती देत आहेत. त्यानिमित्ताने इंटरनेटवरील मराठी ‘डाटा’ वाढत आहे. मात्र,जगभर इंग्रजीत खूप माहिती आहे. ती प्रादेशिक भाषेत येईल, तेव्हा गुगल ख-या अर्थाने ‘लोकल’ बनेल.गावातील बातमीही आता ‘गुगल’वर आली पाहिजे, असाही प्रयत्न आहे. माणसांनी त्यांना काय हवे हा प्राधान्यक्रम ठरविला आहे. त्यामुळे विषयानुरुप माहितीही आता आॅनलाईन जगतात उपलब्ध करुन दिली जाते, असे ते म्हणाले.‘गुगलर्स’चा ‘गिव्हिंग वीक’‘गुगल एक मिशन आहे’, असे समजून ‘गुगल’चे कर्मचारी काम करतात. एखाद्या कर्मचाºयाने सामाजिक संस्थेला मदत करण्याचा विचार केला असेल तर ‘गुगल’ त्याच्या पाठीशी असते. ‘गिव्हिंग वीक’मध्ये गुगलचे कर्मचारी (गुगलर्स) डोनेशन देऊन सामाजिक संस्थांना मदत करतात.एक हजार रेल्वे स्टेशनवर ‘वायफाय’देशातील अनेक लोकांपर्यंत अद्यापही इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यांनाही नेटच्या जाळ््यात आणण्याचा गुगलचा प्रयत्न आहे. सर्वाधिक लोक रेल्वेतून प्रवास करतात, असे लक्षात आल्यानंतर देशातील एक हजार रेल्वे स्थानकावर ‘गुगल’ने मोफत वाय-फाय सुविधा पुरविली आहे.
‘गुगल’चा प्रादेशिक भाषांत खजिना, अरजित सरकेर यांनी ‘लोकमत’शीसाधला संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 1:35 AM