शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

नवी मुंबईतही होणार कर्करोगावर उपचार

By admin | Published: January 24, 2016 2:36 AM

कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा परेलपर्यंतचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबई गाठणे प्रत्येक वेळा शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच टाटा रुग्णालयाने

मुंबई : कर्करोगाच्या उपचारांसाठी रुग्णांना अनेकदा परेलपर्यंतचा प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. मुंबई गाठणे प्रत्येक वेळा शक्य होत नाही. ही समस्या लक्षात घेऊनच टाटा रुग्णालयाने कर्करोगाच्या उपचारांचे विकेंद्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. पुढच्या दोन वर्षांत लहान कर्करोग रुग्णांना आणि रक्ताच्या कर्करोग रुग्णांना नवी मुंबईच्या ‘अ‍ॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर’(अ‍ॅक्ट्रॅक) येथे उपचार मिळणार असल्याचे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी सांगितले. कर्करोग रुग्णांवर उपचार करतानाच या विषयावर संशोधन करण्यासाठी, २००२ मध्ये नवी मुंबई येथे टाटा रुग्णालयाने अ‍ॅक्ट्रॅक केंद्र उभे केले होते. पहिल्या काही वर्षांत या केंद्रामध्ये फक्त संशोधन व्हायचे. आता या ठिकाणी रुग्णांवर उपचार केले जातात. काही रुग्णांवर संशोधनाच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. या ठिकाणी १११ खाटा आहेत. नवी मुंबई, रायगडच्या रुग्णांना आता इथे थेट उपचार मिळत आहेत, पण पुढच्या दोन वर्षांत इथे रक्ताच्या कर्करोग रुग्णांसाठी आणि लहान कर्करोग रुग्णांसाठी स्वतंत्र उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे, पण परेलला येणाऱ्या रुग्णांना तपासण्यासाठी येथे बाह्य रुग्ण विभाग सुरूराहणार आहे. त्यांची तपासणी झाल्यावर त्यांना नवी मुंबईला पाठवण्यात येईल, असे डॉ. बडवे यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईच्या केंद्राचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. २०१४ मध्ये या केंद्रात हेड अँड नेक कर्करोगाच्या ४५०, स्तनाच्या कर्करोगाच्या ७८०, न्यूरोलॉजीसंबंधी कर्करोगाच्या २४०, पोटाच्या कर्करोगाच्या ४०० आणि लहान कर्करोग रुग्णांच्या ९० शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यापेक्षा अधिक शस्त्रक्रिया करण्याचा मानस आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक महिलांच्या कर्करोगाचे निदान प्राथमिक पातळीवर असतानाच होते, पण मेमोग्राफीची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे स्तन काढून टाकण्याशिवाय महिलांना पर्याय नसतो. नवी मुंबई केंद्रात आणलेल्या नवीन मेमोग्राफी मशीनमुळे अतिशय सूक्ष्म परीक्षण करता येऊ शकते. त्यामुळे महिलांचा स्तन वाचवण्यास मदत होईल, असे डॉ. सुदीप गुपा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)संकेतस्थळावर नोंदणीलहान मुलांना कर्करोग झाल्यावर पालक हादरतात. त्यांना काय करावे, कुठे, कसे जावे हे कळत नाही. अशा अवस्थेत पालकांना मदतीचा हात देण्यासाठी लहान कर्करोग रुग्णांची संकेतस्थळावरच नोंदणी व्हावी, अशी यंत्रणा उभी करण्याचा मानस आहे. म्हणजे मुलाचे निदान झाल्यावर पालकांनी संकेतस्थळावर नोंदणी केली की, त्यांना घरून आणण्यासाठी गाडी पाठवण्यात येईल. त्यांना रुग्णालयात आणून उपचार केले जातील आणि पुन्हा घरी सोडण्यात येईल. ही यंत्रणा उभी करायची असल्याचे डॉ. बडवे यांनी सांगितले.