शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

दीड दिवसांत शंभर रुग्णांवर उपचार

By admin | Published: May 12, 2017 2:09 AM

मध्य रेल्वे आणि खासगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांतील रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या ‘वन रुपी क्लिनिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वे आणि खासगी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने शहरांतील रेल्वे स्थानकाबाहेर सुरू केलेल्या ‘वन रुपी क्लिनिक’ला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. रुग्णालय सुरू झाल्यापासून अवघ्या दीड दिवसांत शंभर प्रवासी रुग्णांनी या आरोग्यसेवेचा लाभ घेतला आहे. यात निम्म्याहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी रक्तदाब, मधुमेह आणि ईसीजी तपासणी केल्याचे आढळून आले.‘परवडणारी आरोग्य सेवा’ या धर्तीवर बुधवारी मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर ‘वन रुपी क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने मोफत उपलब्ध करून दिलेल्या जागेवर बुधवारी सुरू झालेल्या रुग्णालयात पहिल्या दिवशी ६०-७० रुग्णांनी उपचार घेतले. गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णांचा आकडा शंभरवर पोहोचला. या रुग्णांमध्ये ६० ते ७० टक्के रुग्ण हे ज्येष्ठ नागरिक आहेत.सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने रेल्वेने प्रवास करतात. परिणामी, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीमध्येच अशा प्रकारची सेवा राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांबाहेर देण्यात येणार आहे. प्रवासी रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास हे रुग्णालय सुरू राहणार आहे. मधुमेह, रक्तदाब, ईसीजी यांसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहेत. शिवाय, आजाराचे निदान केल्यानंतर स्वस्त दरातील मेडिकलमध्ये रुग्णांना औषधे उपलब्ध होत असल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळते, अशी भावना ‘वन रुपी क्लिनिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी व्यक्त केली.