शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
2
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
3
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
4
IND vs PAK: टॉस जिंकून पहिली बॅटिंग की बॉलिंग? भारत-पाकिस्तान मॅचसाठी कसं असेल पिच?
5
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
6
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
7
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
8
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
9
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
10
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
11
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
12
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
13
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
14
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
15
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
16
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
17
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
18
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
19
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
20
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?

देशात १० मनोरुग्णांपैकी एकावरच होतात उपचार

By admin | Published: May 21, 2016 5:13 AM

देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे.

मुंबई : देशात आरोग्य सुविधा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचाव्यात म्हणून केंद्रासह राज्य सरकार विविध कार्यक्रम राबवित आहे. या आरोग्य कार्यक्रमांत शारीरिक आजारांचा प्रामुख्याने विचार केला जातो. पण, देशातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याविषयी सर्वांनाच अजूनही कमालीची अनभिज्ञनता आहे. कारण, १० मनोरुग्णांपैकी एकच मनोरुग्ण उपाचार घेतो. तर, तीन लाख लोकसंख्येमागे एकच मानसोपचार तज्ज्ञ देशात असल्याचे लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.सध्या सर्वांचीच जीवनशैली ताणतणावाची झालेली आहे. जागतिकीकरणामुळे प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढत आहे. त्यामुळे कामाच्या डेडलाइन, वाढीव कामाचे तास या सगळ्याचा ताण सतत येत असतो. त्यातच बदलत्या नातेसंबंधांमुळे मानसिक ताणात भर पडते आहे. पण, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. अजूनही मानसिक आजारांबाबतची जनजागृती हवी तशी न झाल्याने लोक डॉक्टरांकडे जाणे टाळतात. याचा गंभीर परिणाम मोठ्या समूहांच्या मानसिकतेवर होताना दिसत असल्याचे लॅन्सेटमध्ये नमूद केले आहे.जगातील एक तृतीयांश मनोरुग्ण हे भारत आणि चीन या देशांमध्ये आहेत. मनोरुग्णांची सर्वाधिक संख्या चीनमध्ये आहे. पण, २०२५पर्यंत भारत मानसिक आजारांमध्ये पहिल्या क्रमांकावर जाईल, अशी भीतीही या अहवालात नमूद केली आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांना कमी मानसिक उपचार मिळत आहेत. मनोविकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.देशात मानसोपचारतज्ज्ञांची संख्या कमी असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ३ लाख लोकसंख्येमागे फक्त १ मानसोपचारतज्ज्ञ आहे. चिंता आणि उदासीनता या दोन प्रमुख आजारांनी सर्वाधिक व्यक्ती ग्रस्त आहेत. व्यक्ती किती वर्षे जगतो. त्यापेक्षा किती वर्षे सुदृढ आयुष्य जगला याला ‘हेल्दी लाइफ इयर’ असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. या संकल्पनेनुसार, २०१४ या वर्षात देशात ३१ दशलक्ष वर्षे फुकट गेलेली आहेत. तर, हा आकडा २०२५पर्यंत ३८ दशलक्षांपर्यंत पोहोचेल. म्हणजेच दरवर्षी ३८ दशलक्ष वर्षे फुकट जातील, असेही लॅन्सेटच्या अहवालात स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)>मानसिक रोगांवर उपचार करणाऱ्यांची गरज वाढत जाणारवाढत्या लोकसंख्येचा विचार करता येत्या १० वर्षांमध्ये मानसिक आजारांवर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांची गरजही वाढणार आहे. भारतीय लोकांचे जीवन उत्तरोत्तर गतिमान होत चालले आहे, त्याचप्रमाणे सामाजिक बंधांमध्ये झालेले बदलही नव्या ताणांची निर्मिती करते. अशा स्थितीत येत्या दशकभरात मानसोपचार करणारे तज्ज्ञही तितक्याच संख्येने निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे अभियांत्रिकी किंवा इतर करिअरकडे पाहिले जाते त्याचप्रमाणे या करिअरकडे पाहिले पाहिजे. एक मनोविकारतज्ज्ञ पूर्ण क्षमतेने तयार होण्यासाठी नऊ ते दहा वर्षांचा कालावधी लागतो, त्यामुळे पुढील गरज ओळखून आताच तयारी करावी लागते. मानसिक आजारांवरील उपचार करण्यास तज्ज्ञ नसतील तर ती पोकळी भोंदू किंवा अंधश्रद्धा पसरवणारे लोक घेण्याची भीती मोठी आहे. - डॉ. राजेंद्र बर्वे, मनोविकारतज्ज्ञ