शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

महिलेच्या उपचारासाठी ३ दिवस तब्बल ६० किलोमीटरची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:34 AM

छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.

लाहेरी (गडचिरोली) : छत्तीसगडमधील दुर्गम भागातील महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्याने खाटेची कावड करून तिच्या नातेवाईकांनी तब्बल ६० किलोमीटरची पायपीट करुन तिला लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरूवारी दाखल केले.महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळील गरेकल (जि. नारायणपूर) येथील माहरी बोळंगा पुंगाटी ही आजारी पडली. परंतु तिच्या गावापासून जिल्हा मुख्यालय सुमारे ८० किमी अंतरावर असून रस्ता व वाहतुकीच्या साधनांचा अभाव आहे. त्यामुळे नातेवाईकांनी तिला गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्याचे ठरविले. त्यासाठी खाटेची कावड करुन त्यात तिला बसविले आणि ९ जानेवारीला गरेकल येथून प्रस्थान केले.उपचार सुरू, प्रकृती स्थिरगरेकल हे गाव भामरागड तालुक्याच्या सीमेवरून पलिकडे ४० किमी अंतरावर आहे. सीमेपासून लाहेरी २० किमी अंतरावर आहे. ६० किमी अंतर महिला रुग्णासह ६ नातेवाईकांनी तीन दिवसात पार करुन ते गुरूवारी सायंकाळी लाहेरी आरोग्य केंद्रात एकदाचे पोहोचले.आरोग्य अधिकारी व कर्मचाºयांनी तिच्यावर लगेच उपचार सुरू केला. त्यानंतर रुग्णवाहिकेने भामरागड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीही स्थिर आहे.दोन ठिकाणी मुक्कामगरेकल येथून निघाल्यानंतर महिला रुग्णासह सहा नातेवाईकांनी दोन ठिकाणी मुक्काम केला. दरम्यान कोसरी (भात) शिजवून प्रवासातच खाल्ले.एटापल्ली तालुका मुख्यालयापासून दोन किमी अंतरावरील पद्देवाही येथील महिला सुमन मडावी हिचा मृतदेह १० जानेवारीला विहिरीत आढळून आला होता. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने कुटुंबीयांना तिचा मृतदेह बैलबंडीत टाकून रुग्णालयापर्यंत आणावा लागला होता.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र