शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
2
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
3
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
4
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
5
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
6
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
7
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
8
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
9
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
10
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
11
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
12
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
13
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
14
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
15
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
16
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
17
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
18
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
19
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
20
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  

आदिवासी गुंतला मशागतीत

By admin | Published: May 30, 2016 1:39 AM

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या भातशेतीच्या कामांचा हंगाम सुरू आहे.

डिंभे : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात सध्या भातशेतीच्या कामांचा हंगाम सुरू आहे. शेतीच्या मशागतीबरोबरच जमीन भाजणीची कामे सध्या अंतिम टप्प्यात आली असून, आदिवासी शेतकरी सध्या भातशेतीच्या कामांत गुंतला असल्याचे पाहावयास मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी भातशेती केली जाते. दर वर्षी या भागातील पाटण,आहुपे, तसेच भीमाशंकर खोऱ्यातील सुमारे ४० गावांतील हजारो हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली येत असते. भातपीक हे आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्यपीक असल्याने या पिकाच्या तयारीसाठी राब काढणी, झाडांचा पालापाचोळा जमा करणे, जनावरांचे शेण वाहून रोपात अंथरणे इ.कामे दरम्यानच्या कालावधीत जमिनीमध्ये अनेक प्रकारचे म्युकर्स व जीवजंतू निर्माण होतात. हे जीवजंतू कोवळ्या भातरोपांना हानीकारक ठरतात. तसेच पेरणीनंतर भातरोपांमध्ये उगवणाऱ्या तणांचाही नाश करावा लागतो. राब, गवत, शेणखत, पालापाचोळा यांच्या साहाय्याने जमीन भाजल्याने खाचरात उत्तम प्रकारचा वाफा तयार होतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या वाफ्यामध्ये भातबियाणे पेरल्याने लागवडीसाठी भाताचे उत्तम रोप तयार होते. वाफे उपटताना सोयीस्कर जात असल्याने भात उत्पादन घेणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे जमीन भाजल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आहे. पावसाळा सुरू होताच आदिवासी शेतकरी भातपेरणीच्या कामांना लागणार आहे. यंदाच्या वर्षी पावसाने जर लवकर हजेरी लावली तर आदिवासी शेतक-यांना याचा मोठा फायदा होणार आहे.