शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 3:13 PM

धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही.त्यामुळेच सरकारविषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरुणांनी आदिवासी विकास कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

ठळक मुद्देधनगर समाजाच्या वतीने ३१ आॅगस्ट रोजी औरंगाबाद येथे एल्गार पुकारण्यात येणार आंदोलकांनी कार्यालयात फेकलेल्या पत्रकात धनगर आरक्षणाचा शेवटचा लढा असा मजकूर

 पुणे: धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी दोघा व्यक्तींनी विधानभवन कार्यालया जवळील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात तोडफड केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट )  दुपारी घडली. निवेदन देण्याच्या बहाण्याने आलेल्या आंदोलकांनी भंडारा उधळत मागण्यांचे पत्रक कार्यालयात भिरकावले. त्यानंतर कार्यालयातील खुर्ची आणि काचा फोडत आरक्षणाच्या घोषणा देत कार्यालयातून पलायन केले.   धनगर आरक्षणाबाबत निवेदन द्यायचे आहे, असे सांगून दोन युवक क्वीन्स गार्डन येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ते संस्थेच्या आस्थापना विभागात गेले. त्यानंतर दोघा युवकांनी कार्यालयात भंडारा उधळून दिला. त्यानंतर मागण्यांचे पत्रक भिरकावित कार्यालयातील खूर्ची तोडली. तसेच फाईल ठेवण्याच्या कपाटाच्या काचा फोडल्या. यानंतर घोषणा देत आंदोलक निघून गेले. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या गोंधळामुळे कर्मचारी देखील भांबावून गेले होते. त्यामुळे कोणी आंदोलकांना रोखण्याचा देखील प्रयत्न केला नाही. आंदोलकांनी कार्यालयात फेकलेल्या पत्रकात धनगर आरक्षणाचा शेवटचा लढा असा मजकूर लिहीला आहे. तसेच सरकार विरुद्ध धनगर निकाली जंगी मैदान असे त्यावर नमूद केले आहे. शुक्रवार दिनांक ३१ आॅगस्ट औरंगाबाद येथील आमखास मैदान, शाहू महाराज पुतळ्याजवळ असे लढ्याचे स्थळही त्यात देण्यात आले आहे. प्रत्येकाने या अंतिम लढाईत मराठवाड्यात दाखल व्हावे असे आवाहन त्यात करण्यात आले आहे. 

टॅग्स :Puneपुणेreservationआरक्षण