शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
3
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
4
Ed Sheeran ची पुन्हा भारतात कॉन्सर्ट, ६ शहरांमध्ये घुमणार गायकाचा आवाज; कधी आणि कुठे? वाचा
5
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
6
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
7
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
8
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
9
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
10
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
11
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
12
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
13
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
14
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
15
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
16
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
17
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
18
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
19
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
20
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात

आदिवासी नोकरभरतीला स्थगिती

By admin | Published: January 29, 2015 5:36 AM

शहापूर तालुक्यात ६५ टक्के बिगर आदिवासी समाज असतानाही क व ड वर्गांतील नोकऱ्यांत बिगर आदिवासी समाजाला संधी न देण्याच्या

भातसानगर : शहापूर तालुक्यात ६५ टक्के बिगर आदिवासी समाज असतानाही क व ड वर्गांतील नोकऱ्यांत बिगर आदिवासी समाजाला संधी न देण्याच्या आदेशाविरोधात न्यायालयात गेलेल्या बिगर आदिवासी हक्क बचाव कृती समितीला यश मिळाले आहे. सहा महिन्यांपूर्वी आदिवासी विकास आयुक्त कार्यालयाकडून नोकर भरती घेण्यात आली होती. त्यात आदिवासींना १०० टक्के आरक्षण असल्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. समितीचे अध्यक्ष काशिनाथ तिवरे यांनी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. अध्यादेश त्वरित रद्द करावा, यासाठी बिगर आदिवासी हक्क बचाव समितीने न्यायालयात धाव घेतली होती. याच दरम्यान आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून आदिवासींची १०० टक्के नोकरभरती प्रक्रिया सुरू असताना या भरती प्रक्रियेवर स्थगिती मिळण्यासाठी सर्व बिगर आदिवासी समाजाने एकत्र येऊन कोर्टात धाव घेतली होती़ त्यानुसार बिगर आदिवासी हक्क बचाव समितीच्या याचिकेवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. तालुक्यात क व ड वर्गांतील नोकऱ्या फक्त आदिवासी समाजाला राखीव ठेवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली़ यास न्यायमूर्ती वासंती नाईक, उपन्यायाधीश भडांग यांनी १०० टक्के आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याचे आदेश दिले. समितीचे अध्यक्ष काशिनाथ तिवरे, सचिव महेश धानके, सल्लागार दत्ता पाटील यांनी ही माहिती दिली. (प्रतिनिधी)