संदिप झिरवाळ
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ६ - आतापर्यंत आपण एखाद्या मृत व्यक्ती किंवा खूपच झाले तर एखाद्या मृत प्राण्याला नागरिकांनी श्रद्धांजली वाहतानाचे बघितले आहे. मात्र नाशिकच्या वृक्षप्रेमींनी दोन दिवसांपूर्वी राममंदिराजवळ कोसळलेल्या एका ऐतिहासिक वटवृक्षाला श्रद्धांजली वाहून वृक्षांप्रति आदरभाव दाखवून दिला आहे.
राममंदिर पूर्व दरवाजाजवळ बुधवारी सायंकाळी 100 वर्षे जुना वटवृक्ष कोसळल्याची घटना घडली होती. परिसरातील सर्वात जुना व मोठा वटवृक्ष म्हणून या झाडाची ओळख होती. वटवृक्ष कोसळल्याने परिसराची तसेच निसर्गाची मोठी हानी झाली आहे. पर्यावरण टिकून राहावे यासाठी वृक्ष वाचविणे ही काळाची गरज अाहे हे सांगण्यासाठी तसेच जुने वृक्ष टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नेचर क्लब ऑफ नाशिक, पर्यावरणवृ प्रेमी व परिसरातील वृक्षप्रेमींनी एकत्र येऊन त्या कोसळलेल्या वटवृक्षाला श्रद्धांजली वाहून शोकसभा घेतली.