शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

ट्रेकला जाताय? जरा जपून..!

By admin | Published: July 05, 2016 2:02 AM

पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला.

- कांता हाबळे,  नेरळ

पावसाळा सुरू झाल्यापासून तरुणाईला सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील ट्रेकच्या आनंदाचे वेध लागले आहेत. परंतु आठवडाभरापूर्वी माथेरानचा डोंगर चढताना एक तरुण दरीत कोसळला. या घटनेने उत्साही तरुणांना धोक्याचा कंदील दाखवला आहे. याचा अर्थ पावसाळा संपेपर्यंत सहलीला जाऊ नये असा नाही; मात्र आनंद लुटण्याच्या भरात संकट ओढवून न घेण्याची खबरदारी तरुणांनी घेणे महत्त्वाचे आहे.माथेरानच्या डोंगरावर ट्रेक करण्यासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण आदी ठिकाणांहून तरुण मोठ्या प्रमाणात येत असतात. आठवडाभरापूर्वी डोंबिवली येथील १८ वर्षीय कॉलेज तरुण नेरळ येथून विकटगड येथे ट्रेकिंगसाठी आला होता. ट्रेकसाठी निघाल्यानंतर तो तरुण पावसाच्या पाण्यामुळे निसरड्या झालेल्या डोंगरावरून चढताना खाली कोसळून जखमी झाला. मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. हा तरुण आपल्या मोठ्या भावासह अन्य पाच मित्रांसोबत नेरळ येथे आला होता. त्यांना ट्रेकिंग करीत माथेरानच्या डोंगर रांगात असलेल्या विकटगड येथे जायचे होते. त्यांनी प्रवास सुरू करताना सोपा मार्ग न निवडता जंगलातून पेब किल्ल्याकडे ट्रेकिंग करीत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नेरळजवळील आनंदवाडी येथून असलेल्या जंगलातील रस्त्याने पेब किल्ल्याकडे कूच केली. त्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने हा प्रकार घडला. त्यामुळे ट्रेक करताना स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ट्रेक करताना बऱ्याचदा झाडेझुडपे वाढली असल्याने रस्ता चुकण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी एकत्रित चालले तर बाकीच्या मित्रांना त्यांची साथमिळते. तसेच उंच डोंगर व कपाऱ्यावर चढून सेल्फी काढण्याचे धाडस करणे चुकीचे आहे कारण सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून तोल जाण्याची शक्यता असते. ट्रेक सुरू करण्यापूर्वी येथील परिसराची संपूर्ण माहिती स्थानिकांकडून जाणून घेणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे धोका टळू शकतो. त्यामुळे ट्रेकसाठी येणाऱ्या तरुणांनी तसेच पर्यटकांनी ट्रेक करताना कोणतीही दुर्घटना होऊ नये अशी सावधगिरी बाळगून ट्रेक करावे व ट्रेक करताना स्थानिकांकडून परिसराची माहिती घेऊनच पुढे वाटचाल करावी.हे करणे टाळा- कानात हेडफोन घालू नये. मागून कोण आवाज देत असेल तर आवाज येत नाही- ट्रेक करताना धूम्रपान व मद्यपान करू नये.- उंच डोंगरकपाऱ्यांवर चढून सेल्फी काढणे टाळणे- निसर्गसंपदेला धोका पोहचू नये याची विशेष काळजी घेणे- मदत म्हणून स्थानिकांचे मोबाइल नंबर जवळ असणे गरजेचे.ट्रेकसाठी आवश्यक साहित्य : सॅक, शूज, खाण्याचे पदार्थ, बॅटरी, आवश्यक औषधे, पाण्याची बाटली, पाण्यामुळे साहित्य भिजू नये यासाठी प्लॅस्टिक पिशवी.