त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : येथे सन २०२७-२८ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाने ध्वजारोहणासह शाही स्नानाच्या तारखांचे पत्र अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज यांना सुपूर्द केल्या आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरीगिरीजी महाराज सध्या त्र्यंबकेश्वर येथे त्यांच्या जुना आखाड्यात आले असून, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघातर्फे सिंहस्थ कुंभमेळा कालावधी सुरू होण्यापासून ते सिंहस्थ ध्वजपर्व व शाही स्नानाच्या तारखा पंचांगासह महंत हरीगिरीजी महाराज यांच्याकडे गुरुवारी सुपूर्द करण्यात आल्या.
अशा आहेत तारखा ध्वजारोहण - अश्विन वद्य षष्ठी -३१ ऑक्टोबर २०२६.
प्रथम शाही स्नान - आषाढ कृष्ण अमावास्या - २ ऑगस्ट २०२७
द्वितीय शाही स्नान - श्रावण वद्य अमावास्या - ३१ ऑगस्ट २०२७
तृतीय शाही स्नान - भाद्रपद शु. द्वादशी (वामन द्वादशी) -१२ सप्टेंबर २०२७
ध्वजावतरण - श्रावण शुद्ध तृतीया - २४ जुलै २०२८