शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

एसटीच्या कॉल सेंटरवर ‘चौकशी’साठी ट्रिंग-ट्रिंग, पहिल्याच दिवशी लाइन व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 2:53 AM

राज्यभरातील प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेले कॉल सेंटर गुरुवारी सुरू झाले.

मुंबई : राज्यभरातील प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कॉल सेंटरला पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद दिला. अनेक वर्षे केवळ कागदावर राहिलेले कॉल सेंटर गुरुवारी सुरू झाले. शुक्रवारी संध्याकाळी सहापर्यंत १८००२२१२५० या टोल फ्री क्रमांकावर १,७०० फोन आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. यापैकी सुमारे ८० टक्के प्रवाशांनी चौकशीसाठी विचारणा केल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. मात्र, पहिल्याच दिवशी कॉल सेंटर हेल्पलाइन व्यस्त लागत असल्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी होती.राज्यातील सुमारे ५७ लाख प्रवासी रोज एसटीने प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. राज्य परिवहन महामंडळाने कॉल सेंटरसाठी एका खासगी कंपनीसोबत ३ वर्षांचा करार केला आहे. करारान्वये पहिल्या टप्प्यात कॉल सेंटर सुरू झाले. गुरुवारी दुपारी कॉल सेंटरचे उद्घाटन झाले. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत १,७०० कॉल आले असून सर्वाधिक फोन हे बस फेºयांच्या चौकशीसाठी आल्याची माहिती एसटीचे जनसंपर्क अधिकारी ए. एस. तांबोळी यांनी दिली. यापैकी ८० टक्के फोन चौकशीसाठी होते, असेही तांबोळी यांनी स्पष्ट केले.कॉल सेंटर हे तीन शिफ्टमध्ये चोवीस तास सुरू राहणार आहे. सद्यस्थितीत तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी ३ प्रतिनिधी प्रवाशांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत.बसचे वेळापत्रक, एसटी आरक्षण, प्रवासी सूट माहिती आणि तिकीट दर यांचा समावेश चौकशीसाठी आलेल्या कॉलमध्ये होता. ८० टक्के फोन हे चौकशीसाठी आले. उर्वरित फोन कॉल्स तक्रारी आणि सूचनांसाठी आल्याची माहिती महामंडळाने दिली. पहिल्याच दिवशी बहुतांशी प्रवाशांसाठी ‘हेल्पलाइन’ व्यस्त आली. त्यामुळे बहुतांशी प्रवाशांचा हिरमोड झाला.मनुष्यबळ वाढविणारपहिल्या दिवशी कॉल सेंटरला चांगला प्रतिसाद लाभला आहे. प्रवाशांसाठी हेल्पलाइन क्रमांक व्यस्त असल्याचे समजले. याबाबत कॉल सेंटरमध्ये मनुष्यबळ वाढविण्याबाबत विचार सुरू आहे. लवकरच त्या संदर्भात योग्य पावले उचलली जातील.- रणजीत सिंह देओल, एसटी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ