अझहर शेख, नाशिक : नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला असून, लवकरच सर्वोच्च न्यायालयात एका विशेष जनहित याचिके द्वारे तो सादर केला जाणार आहे.गाजत असलेल्या तिहेरी तलाक या विषयावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालामध्ये सरकारला सहा महिने कायदा तयार करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या शाही मशिदीत शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीमध्ये धार्मिक शरियतनुसार ‘तलाक’वर चर्चा करण्यात आली. यावेळी कायदा तयार करताना सरकारने मुस्लीम समाजाच्या देशातील काही शहरांमधील प्रमुख मदरशांच्या मुफ्ती या अतिउच्च दर्जाच्या धर्मगुरूंना तलाक कायद्याच्या मसुदा समितीमध्ये स्थान द्यावे, असा ठराव करण्यात आला. या ठरावानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात येणार आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका दाखल करून शरिअतनुसार धर्मगुरूंनी तयार केलेला ‘तलाक’ संदर्भातील विशेष आराखडा मान्य केला जावा, अशी दाद मागितली जाणार आहे. तलाकची खरी पद्धत, धार्मिक नियमांनुसार तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत धर्मगुरूंनी या विशेष आराखड्यात आपली मते मांडली आहेत.
‘तिहेरी तलाक’ शरियतनुसार टाळता येऊ शकतो, मुस्लीम धर्मगुरूंनी बनविला आराखडा; लवकरच सर्वोच्च न्यायालयात सादर
By azhar.sheikh | Published: August 23, 2017 4:30 PM
नाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. शरियतचे पालन करत तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो, याबाबत विशेष आराखडा तयार करण्यात आला
ठळक मुद्देनाशिकच्या धर्मगुरूंनी एकत्र येत शरियतमधील ‘तलाक’ संकल्पना अभ्यासून सूक्ष्म निरिक्षणे नोंदविली. तिहेरी तलाक कसा टाळता येऊ शकतो?सर्वोच्च न्यायालयात एका विशेष जनहित याचिकेद्वारे लवकरच आराखडा सादर मदरशांच्या मुफ्ती या अतिउच्च दर्जाच्या धर्मगुरूंना तलाक कायद्याच्या मसुदा समितीमध्ये स्थान द्यावे, असा ठराव