शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

पदपथावरील अतिक्रमणांचा त्रास

By admin | Published: July 23, 2016 2:04 AM

पदपथावरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण, नो पार्किंगमध्ये उभी केली जाणारी वाहने, खोदलेले पदपथ, रखडलेली ब्लॉक बसवायची कामे

चिंचवड : पदपथावरील हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण, नो पार्किंगमध्ये उभी केली जाणारी वाहने, खोदलेले पदपथ, रखडलेली ब्लॉक बसवायची कामे, केएसबी चौकातील संथगतीने सुरू असलेला उड्डाणपूल आणि त्यामुळे होणारी वाहतूककोंडी असे चित्र आहे शाहूनगर-संभाजीनगर प्रभागातील. मॉडेल वॉर्ड म्हणून विकसित होत असणाऱ्या प्रभागातही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पदपथावरील अतिक्रमणाचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. शाहूनगर-संभाजीनगर प्रभाग क्रमांक नऊमध्ये शाहूनगर, संभाजीनगराचा प्रमुख भाग येतो. सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, नारायण बहिरवाडे या प्रभागाचे नगरसेवक आहेत. कामगार, कष्टकरी, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय नागरिक येथे वास्तव्यास आहेत. प्राधिकरणानंतर सुयोनियोजितपणे विकसित झालेला हा एकमेव भाग आहे. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरण असा संमिश्र भाग या प्रभागात येते. शाहूनगरात आरटीडीसी, एचडीएफसी या प्रमुख वसाहती आहेत; तर संभाजीनगरातही मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कवयित्री बहिणाबाई सर्पोद्यान उद्यान आणि बर्ड व्हॅली पर्यटनाचे प्रमुख स्थळ बनले आहेत. कस्तुरी मार्केट आणि ओसिया मार्केटही या परिसरात येते. संमिश्र भाग असल्याने लोकप्रतिनिधींना विकासकामे करवून घेताना अडचणी येतात. सत्ताधारी राष्ट्रवादीची महापालिकेत सत्ता आहे, तर मंगला कदम या सत्तारूढ पक्षनेत्या आहेत. मॉडेल वॉर्ड करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रभागात निधी आणला. विकास कामांचा धडका लावला असला, तरी अर्धवट विकासकामे नागरिकांच्या दृष्टीने अडचणीची ठरत आहेत. प्रभागात ठिकठिकाणी पदपथांची कामे सुरू आहेत. ती अर्धवट असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. तसेच पदपथाचे काँक्रिटीकरण करून त्यावर रंगीबेरंगी ब्लॉक बसविले जात आहेत. हे ब्लॉक शहरातील अन्य कोणत्याही पदपथांवर दिसत नाहीत. अनेक ठिकाणी पदपथांचे काम अपूर्ण असल्याने राडारोडा पडल्याचे दिसून येत आहे. महाबली चौकाकडून अष्टविनायक गणेश मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडई भरलेली असते. या रस्त्यावर काही व्यावसायिकांनी पदपथावर दुकानाचे साहित्य ठेवले आहे. असेच चित्र अन्य रस्त्यांवरही दिसून येते. शिवशंभो चौकातून शिवमंगल सोसायटीकडे जाणाऱ्या पदपथावरही मोठ्या प्रमाणावर भाजीविक्रेते, हातगाडीवाले बसतात. त्यामुळे पदपथावरूनही चालणे कठीण झाले आहे. मंडईची सोय नसल्याने रस्त्यावरच बसावे लागते, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.पुलाचे काम अर्धवटकेएसबी चौकातून कुदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील केसएसबी चौकातील पुलाचे काम अपूर्ण आहे. तसेच त्यासाठी रस्ताही खोदला आहे. त्यामुळे आरटीओकडे जाताना डाव्या हाताला राडारोडा तसाच पडल्याचे दिसून येते. तसेच या रस्त्यावरील बीआरटी लेनवर चारचाकी वाहने पार्क केली जातात. एमआयडीसीतील शाहूनगर, संभाजीनगर प्रभागातील अंतर्गत रस्ते प्रशस्त आहेत. मात्र, त्या रस्त्यावरील पदपथांची अवस्था तितकीशी चांगली नाही. दुरुस्तीची कामे अर्धवट आहेत. पूर्णानगरमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बेशिस्तीचे दर्शन घडते. संभाजीनगरातील एमआयडीएससी जी ब्लॉकमधील सिद्धविनायक मंदिरासमोरील रस्त्यावरील खासगी वाहिन्या टाकणाऱ्यांनी खोदलेले आहेत. पाण्याच्या वाहिनेचे काम करण्यासाठी रस्ता खोदला आहे. या प्रभागात मोठ्या प्रमाणावर वनराई दिसून येते. रस्ता रुंदीकरणात ही झाडे तशीच ठेवलेली आहेत. (वार्ताहर)> संभाजीनगरातील कमलनयन बजाज शाळेकडून कस्तुरी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावर, थरमॅक्स चौकातून रोटरी क्लबकडे येणाऱ्या रस्त्यावरही वाहने अस्ताव्यस्त लावली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. सावरकर पथ ते संभाजीनगरच्या पदपथावर दुकानदारांनी अतिक्रमणे केल्याचे दिसून येते. अर्धवट कामांमुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.