शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ट्रकची कारला धडक; एक ठार, पाच गंभीर

By admin | Published: May 08, 2017 7:59 PM

पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली.

ऑनलाइन लोकमतकोल्हापूर, दि. 8 - पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. त्यामध्ये कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले. त्यापैकी एकाचा सीपीआरमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. भास्कर बालशेट्टी (वय ५५, रा. चित्तूर, आंध्र प्रदेश) असे त्यांचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडला. याबाबतची अधिक माहिती अशी की, आंध्र प्रदेशातील कोंडामीहा-चित्तूर या गावात राहणारे बालशेट्टी कुटुंबीय कारमधून बंगलोरहून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. सोमवारी सकाळी पुणे-बंगलोर महामार्गावर उजळाईवाडी, साई गार्डनसमोर येताच डाव्या बाजूने ओव्हरटेक करणाऱ्या भरधाव ट्रकने कारला जोराची धडक दिली. त्यामध्ये कार उलटून सहा जण गंभीर जखमी झाले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी जखमींना तात्काळ सीपीआरमध्ये दाखल केले. भास्कर बालशेट्टी यांच्या डोक्यासह छातीला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. अन्य जखमी प्रवीण राजन (वय ३५), किरण बालशेट्टी (२८), गीतांजली बालशेट्टी (५०), स्वप्नप्रिया बालशेट्टी (३०, सर्व रा. आंध्र प्रदेश) यांच्यावर उपचार करून खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गोकूळ शिरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.