बोरगाव मंजू/ वणी रंभापूर (जि. अकोला): व-हाडींना घेऊन जाणारा ट्रक टॅँकरवर आदळल्याने दोन जण ठार, तर २३ वर्हाडी जखमी झाले. ही घटना मंगळवारी दुपारी २.३0 वाजताच्या सुमारास अकोला जिल्ह्यातील डोंगरगाव फाट्यानजीक घडली. अपघातात अमरावती ये थील टॅँकरचालक शंकर मधुकर मानकर (५२) आणि वर्हाडी श्याम सावळे (७५) हे दोघे मृत्युमुखी पडले. सुकळी नंदापूर येथील बालकृष्ण दामोदर गवई यांचा मुलगा मंगेशचा विवाह कळंबेश्वर येथे राहणारे बाबूराव इंगळे यांच्या मुलीशी निश्चित करण्यात आला. मंगळवारी दुपारी गवई कुटुंबीय व परिचित एम.एच. ३0-एल ११५0 या ट्रकने कळंबेश्वरकडे निघाले. डोंगरगाव फाट्याजवळ ट्रकचे टायर फाटले. त्यामुळे ट्रक समोरून येणार्या एम.एच २७-सी ६४0 या टॅँकरवर आदळला. अपघातामुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एमआयडीसीचे ठाणेदार शिरीष खंडारे, बोरगाव मंजूचे ठाणेदार भास्कर तंवर, वाहतूक शाखेचे प्रकाश सावकार यांनी कर्मचार्यांसह धाव घेतली. त्यानंतर त्यांनी वाहतूक सुरळीत केली.
ट्रक टॅँकरवर आदळला; दोन ठार, २३ जखमी
By admin | Published: April 20, 2016 2:11 AM