जडीबुटी विकणारे दाम्पत्य ठार : चिमुकली गंभीर, वाहनाचीही मोडतोडनागपूर : दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने जुडीबुटी विकणार्याचा संसार चिरडला. दाम्पत्य ठार झाले. तर, त्यांची चिमुकली गंभीर जखमी आहे. या अपघातात जुडीबुटीवाल्यांची छोटी बस, व्हॅन आणि एका मोटरसायकलचीही मोडतोड केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री ११ वाजता हा भीषण अपघात घडला.उत्तर प्रदेशातील अनेक वैदू ठिकठिकाणी जडीबुटीची दुकाने लावतात. नाडी परीक्षण करून औषधे देणारी ही मंडळी पोटापाण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुकाने लावतात आणि त्यातच आपला संसारही थाटतात. बांदा (यूपी) जिल्ह्यातील बदोसा (अतरसा) येथील कपूरसिंग भूरसिंग चितोडिया (वय ६५) यानेसुद्धा काही दिवसांपूर्वी कामठी मार्गावरील जायका मोटर्ससमोर, ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या भिंतीला लागून आपले दुकान थाटले होते. कपड्याच्या तंबूतील दुकानातच त्याचा संसारही होता. कपूरसिंगची मुलगी पिंकी (वय २0), जावई सुनील कमलेश चितोडिया (वय २३) आणि पिंकीची मुलगी मुस्कान (वय दीड वर्ष) तेथेच राहात होते. मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सुनील आणि पिंकी चिमुकल्या मुस्कानला घेऊन तंबूतच झोपले. तर, कपूरसिंग बाहेर झोपण्याच्या तयारीत असताना भरधाव ट्रक (एमएच ४0/ वाय ८३६१) तंबूत शिरला. त्यामुळे सुनील, पिंकी आणि चिमुकली मुस्कान चिरडली गेली.सुनील आणि पिंकीचा मृत्यू झाला. मुस्कान गंभीर जखमी आहे. ट्रकचालक एवढय़ा निष्काळजीपणे आणि भरधाव वाहन चालवत होता की त्याने दोन बळी घेतानाच कपूरसिंगची टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच २0/ई ८0३७) मारुती व्हॅन एमएच 0२/जे १४२९) आणि हिरो होंडा मोटरसायकल (एमएच ३१/एयू ७४२७) या वाहनांचीही मोडतोड केली. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक पळून गेला. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्याचा शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)कसे होणार मुस्कानचे ?ट्रकचालकाने कपूरसिंगचा भरलापुरला संसार चिरडला. त्याच्या उदरनिर्वाहाची साधनेही निकामी केली. मुलगी आणि जावई ठार झाले. तर चिमुकली मुस्कान गंभीर जखमी आहे. वृद्ध कपूरसिंगला या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. चिमुकल्या मुस्कानचा औषधोपचार कसा करावा, पुढे तिचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न त्याचे दु:ख अधिकच तीव्र करीत आहे.
ट्रकने चिरडला संसार
By admin | Published: June 05, 2014 1:10 AM