ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २४ - धुळ्यातील सूरत- नागपूर महामार्गावर एक ट्रक व वडापची टक्कर होऊन झालेल्या भीषण अपघातात १६ जण ठार झाले आहेत. काटकर फाट्याजवळ शुक्रवारी दुपारच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे गेल्या दोन अडीच तासांपासून सुरत-नागपूर महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
अवैध वाहतुकीमुळे हा भीषण अपघात झाला असून वडापमध्ये ८ ते १० माणसे बसण्याची व्यवस्था असतानाही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरली गेले आणि त्याचा परिणाम होऊन अपघाता झाला व १६ निष्पापांना जीव गमवावा लागला.