त्र्यंबकेश्वर : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर स्वराज्य महिला संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनिता गुट्टे यांच्यासह त्यांच्या महिला कार्यकर्त्यांनी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु देवस्थान अधिकाऱ्यांनी त्यांना प्रवेशापासून रोखले.त्या मंदिरात पोहोचल्यावर तेथील रक्षक व गर्भगृहातील तुंगार मंडळी आदींनी त्यांना गर्भगृहात प्रवेश दिला नाही. देवस्थानने ३ एप्रिलला ठराव करून पुरुषांनासुद्धा गर्भगृह प्रवेश बंद केला आहे. गुट्टे व इतर महिलांना इतरांप्रमाणे दर्शन घेऊन बाहेर काढण्यात आले. मंदिर प्रांगणात त्यांना एका बाकावर बसविण्यात आले. केवळ महिलांना प्रवेश नको म्हणून पुरुषांनाही प्रवेश बंद केल्याचे नाटक देवस्थान विश्वस्त मंडळाने केल्याचा आरोप संघटनेने केला असून मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.
त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना रोखले!
By admin | Published: April 10, 2016 2:19 AM