लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : पुणे शहराचा जलद गतीने होत असलेला विकासाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही औत्सुक्य असल्याचे त्यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान पुण्यातील उद्योजक सुभाष सणस यांना जाणवले. अमेरिकेतील ट्रम्प नॅशनलमध्ये या आठवड्यात महिला व्हिजन ओपन २०१७ सुरू होणार आहे़ ट्रम्प यांच्याकडे वूमन्स ओपनचे यजमानपद आहे़ ट्रम्प यांनी गोल्फ कोर्सला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला़ या भेटीत बांधकाम व्यवसायिक सुभाष सणस आणि अनिल सेवलेकर यांना ट्रम्प यांना भेटण्याचा योग आला. सायंकाळच्या भोजनादरम्यान भारत हा चर्चेचा मुख्य विषय होता़ चर्चेदरम्यान त्यांनी पुण्याचे पहिले महापौर बाबूराव सणस यांना अभिवादन केले़ पुण्याचा जलद गतीने होत असलेला विकास आणि भारतीयांबद्दलचे प्रेम त्यांनी व्यक्त केले. या भेटीबद्दल सुभाष सणस म्हणाले, जगातील सर्वांत मोठ्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असूनही डोनाल्ड ट्रम्प हे अतिशय साधे आणि सर्वसामान्यांशी आनंदाने संवाद साधत होते़ त्यांना पुण्याविषयी माहिती सांगितल्यावर त्यांनी ती मोठ्या आत्मीयतेने ऐकून घेतली़ आमच्याजवळ कॅमेरा नव्हता, तेव्हा त्यांनी कॅमेरामनला बोलावून फोटो काढून घेतला़ भारतात आल्यावर पुन्हा भेटायला बोलविन, असे आवर्जुन सांगितले.
पुण्याच्या विकासात ट्रम्प यांना रस
By admin | Published: July 10, 2017 1:37 AM