ऑनलाइन लोकमत -
नाशिक, दि. २५ - त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश केल्याबद्द्ल भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याअगोदरही तृप्ती देसाई यांनी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी पोलिसांनी त्यांना रस्त्यातच रोखलं होतं. तृप्ती देसाईंच्या मोर्च्याला हिंदू जनजागृती समिती, सनातन तसंच नगरपरिषदेने विरोध केला होता. भूमाता ब्रिगेड प्रसिद्दी मिळवण्यासाठी हे करत असल्याचा आरोप मंदिर समितीचे संघटक सुनील घनवट यांनी केला होता.
'आम्ही मंदिरात जाऊन पुजा केली आणि महिलांना गाभा-यात प्रवेश मिळावा यासाठी प्रार्थना केल्याचं', तृप्ती देसाईंनी सांगितलं आहे. बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू महिला व पुरूष यांना प्रवेश आहे. मात्र, गर्भगृहात केवळ सोवळे नसलेल्या अर्धवस्त्रधारी पुरूषांनाच प्रवेश आहे.
Activist Trupti Desai detained by police after she entered Trimbakeshwar Temple (Maharashtra) and offered prayers pic.twitter.com/PnEAdbcEK5— ANI (@ANI_news) March 25, 2016
Local women protest as Activist Trupti Desai entered Trimbakeshwar Temple (Maharashtra) and offered prayers pic.twitter.com/33WE305ULF— ANI (@ANI_news) March 25, 2016