शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

वरलीचे आकडे काढण्यासाठी नरबळीचा प्रयत्न!

By admin | Published: January 31, 2017 2:38 AM

बालकाच्या समयसूचकतेने वाचले प्राण: नरबळी, काळीजादू कायद्याअंतर्गत मांत्रिकासह दोघांना अटक.

शेगाव, दि. ३0- वरलीचे आकडे काढण्यासाठी एका १४ वर्षीय पायाळू बालकाचा बळी देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार येथे रविवारी घडला. सदर बालकाने समयसूचकता दाखवून पळ काढल्याने त्याचा जीव वाचला. याप्रकरणी पोलिसांनी एका मांत्रिकासह दोघांना अटक केली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपींना सोमवारी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दोघांना एक फ्रेब्रुवारीपर्यंंंत न्यायालयीन कोठडी सुनावली. खामगाव रोडवरील गजानन वाटीका येथे सुरु असलेल्या पारायणातील महाप्रसाद घेऊन एक १४ वर्षीय मुलगा बाहेर आला. यावेळी व्यंकटेशनगरात राहणार्‍या गणेश प्रल्हाद ताले (२९) याने त्याला घरी सोडतो असे सांगून आपल्या मोटारसायकलवर बसवून एमएसईबी चौकातील एका पानटपरीच्या मागे नेले. तेथे शंकर जगदेव शेगोकार उर्फ महाराज (६५ रा. तिनपुतळा शेगाव) हा आधीच हजर होता. तेथे दोघांनी बालकाच्या अंगावर कपडा टाकून त्याच्यासमोर कापूर जाळला. मंत्रोच्चार करीत त्याच्या हातात उलटी कपबशी देऊन त्यास आकडे म्हणावयास लावले. सदर मुलाने आकडे बरोबर सांगितल्यानंतर हा मुलगा आपल्या ह्यकामाचाह्ण आहे असे एकमेकांशी बोलले. यानंतर महाराज व तालेने सदर बालकावर अघोरी कृत्य सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्यासोबत काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येताच बालकाने समयसूचकता दाखवून तेथून पळ काढला. घरी परतल्यानंतर त्याने या घटनेची माहिती वडीलांना दिली. याबाबत बालकाच्या पित्याने रविवारी शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूध्द महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि आणि अघोरी कृत्य प्रतिबंधात्मक तसेच काळीजादू अधीनियम २0१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला व मांत्रिकासह दोघांना रात्री उशिरा अटक केली. पोलिसांनी मांत्रिकाने जादुटोण्यात वापरलेले साहित्य जप्त केले आहे.