शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीचे पाठबळ देण्यासाठी प्रयत्न करावे, रेडिओलॉजिस्टच्या जागतिक परिषदेत राज्यपालांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:50 PM

तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट काही सेकंदातच रेडिओलॉजिस्टला दाखवू शकता त्याला भौगोलिक मर्यादा राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाची जोड  देऊन राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीसाठी सहकार्य करावे.

मुंबई - तंत्रज्ञानामुळे तुम्ही तुमचे मेडिकल रिपोर्ट काही सेकंदातच रेडिओलॉजिस्टला दाखवू शकता त्याला भौगोलिक मर्यादा राहिलेली नाही. माहिती तंत्रज्ञानाची जोड  देऊन राज्यातील ग्रामीण भागातील रुग्णालयांना टेली रेडिओलॉजीसाठी सहकार्य करावे. जेणेकरून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविणे शक्य होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.17 वी आशियायी रेडिओलॉजी परिषद आणि इंडियन रेडिओलॉजीची 71 वी वार्षिक परिषद हॉटेल रेनिसन्समध्ये आयोजित करण्यात आली होती. तिचे उदघाटन राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नसीम खान, इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भुपेंद्र आहुजा, सचिव शैलेंद्र सिंग, जिग्नेश ठक्कर आदींसह विविध देशातील तसेच राज्यातील डॉक्टर्स उपस्थित होते.भारतात अशी जागतिक परिषद 25 वर्षांनंतर होतेय आणि तिच्या आयोजनाचा मान रेडिओलॉजी असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेला मिळाला त्याबद्दल राज्यपालांनी अभिनंदन केले. राज्यपाल म्हणाले की, रोगाचे वेळीच निदान आणि तो रोखण्यासाठी रेडिओलॉजिस्ट महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आज एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के नागरिक ग्रामीण भागात राहत आहेत. आरोग्यसेवा ग्रामीण भागात अधिक सक्षम होण्यासाठी आणि रोगांचे वेळीच निदान होण्यासाठी टेली रेडिओलॉजीचा वापर होणे गरजेचे आहे. आरोग्यक्षेत्रात अचूक निदानासाठी सीटी स्कॅन, एमआरआय, आणि पेट स्कॅन उपयुक्त ठरत आहेत. येत्या  काळात या क्षेत्रात क्रांतिकारक बदल नक्कीच घडतील, असा मला विश्वास आहे.राज्यपाल म्हणाले की, रोगनिदानासाठी रेडिओलॉजी महत्त्वाची भूमिका बजावत आहे. रेडिओलॉजीत आधुनिक संशोधन झाल्याने लाखो रुग्णांचे प्राण वाचले आहेत. शिवाय वेळेवर आजाराचे अचूक निदान करण्यात यश आल्यामुळे या तंत्रज्ञानामुळे लाखो लोकांचे आयुष्य सुसह्य केले आहे. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाने आघाडी घेतलेली असताना रेडिओलॉजी क्षेत्रातील तंत्रज्ञानाने मोठी झेप घेत त्याचा मानवजातील फायदा करून दिला आहे. हृदयविकार, मूत्रपिंड, आतडे आणि अन्य अवयवांना होणाऱ्या आजरांचे वेळीच निदान आणि उपचार करणे रेडिओलॉजीमुळे शक्य झाले आहे.जागतिक स्तरावर भारत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीचा देश आहे. रेडिओलॉजीसाठी वापरली जाणारी साधने, यंत्रसामुग्री महागडी आहेत आणि त्याची निर्मिती परदेशात होते. अशावेळेस ह्या यंत्रसामुग्रीची निर्मिती भारतातच झाली तर त्याच्या किमती नक्कीच कमी होतील. परिणामी इमेजिंगचे दर कमी होण्यास मदत होईल. जनतेला माफक दरात सेवा पुरविण्यासाठी रेडिओलॉजी संघटनेने पुढाकार घ्यावा, असे सांगून देशात मुलींचा जन्मदर कमी होत आहे. अनेक राज्यामध्ये 1000 मुलांमागे मुलींचे प्रमाण 900 ते 950 च्या आसपास आहे. गर्भलिंग निदान चाचणी होऊ नये यासाठी रेडिओलॉजिस्टनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही राज्यपालांनी केले. दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

टॅग्स :Mumbaiमुंबई