शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सलमानच्या लायसन्सबाबत मंगळवारी निर्णय

By admin | Published: February 28, 2015 5:15 AM

हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा वाहन परवाना सादर होणार की नाही, याचा निर्णय येत्या मंगळवारी सत्र न्यायालय देणार आहे़

मुंबई : हिट अ‍ॅण्ड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा वाहन परवाना सादर होणार की नाही, याचा निर्णय येत्या मंगळवारी सत्र न्यायालय देणार आहे़२००२ साली हा अपघात झाला तेव्हा सलमानकडे वाहन परवाना नव्हता़ त्याला वाहन परवाना २००४ साली मिळाला, असा सरकारी पक्षाचा दावा आहे़ आरटीओ अधिकाऱ्यानेही सलमानला २००४ साली वाहन परवाना मिळाल्याची साक्ष दिली आहे़ त्यामुळे सलमानने त्याचा वाहन परवाना न्यायालयात सादर करावा, अशी मागणी करणारा अर्ज विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला़ याला बचाव पक्षाचे वकील श्रीकांत शिवदे यांनी विरोध केला़ ही घटना घडली त्या वेळी सलमानकडे वाहन परवाना नव्हता, हे सरकारी पक्षाने त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध करावे़ यासाठी सलमानचा वाहन परवाना न्यायालयात सादर करण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद अ‍ॅड़ शिवदे यांनी केला़ उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने सरकारी पक्षाच्या अर्जावरील निर्णय येत्या मंगळवारपर्यंत राखून ठेवला़