शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

वैष्णवांना आस तुकोबांच्या पालखी सोहळ्याची

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 1:53 PM

 हरिनाम गजराने देहूनगरी भक्तिमय झाली आहे

ठळक मुद्दे श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान व प्रशासनदेखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्जयंदा पाऊस लांबला.. शेतीची कामे अपूर्ण राहिल्याने सोहळ्याच्या गर्दीवर परिणाम अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी

विश्वास मोरेदेहूगाव : विठ्ठल भेटीची आस मनी ठेऊन आषाढी वारीसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३४ व्या पालखी सोहळा आज प्रस्थान ठेवणार आहे. प्रस्थान सोहळ्याची वेळ समीप आल्याने वैष्णवांचा टाळ मृदंग गजर सुरू झाला आहे.  हरिनाम गजराने देहूनगरी भक्तिमय झाली आहे. सर्वांना ओढ लागली आहे ती पालखी सोहळा प्रस्थानाची. 

 श्रीसंत तुकाराममहाराज संस्थान व प्रशासनदेखील भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले असून आषाढी वारीच्या निमित्ताने देहूनगरीत आलेल्या वारकरी व भाविकांमुळे सारा परिसर भक्तिमय झाला आहे.

आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वारकरी कालपासून देहूनगरीत दाखल झाले आहेत.

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, वैकुंठगमण मंदिर, येलवाडी येथील भागीरथी माता मंदिर, विठ्ठलनगर येथील पादुका मंदिर व चिंचोली पादुका मंदिर व अनगडशहावली दर्गा परिसरात वारकऱ्यांची गर्दी दिसून येत आहे.पालखी प्रस्थानाचा दिवस असल्याने सकाळपासूनच वारकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.  

भागवत धर्माची भगवी पताका आसमंती फडकवत वारकरी  विट्टल रुक्मिणी मंदिरात येताना दिसत आहेत.  या भाविकांच्या सेवेसाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाल्याचे दिसून आले.  पोलीस बंदोबस्तालाही कालपासूनच सुरुवात झाली आहे. 

श्रीसंत तुकाराममहाराजांच्या पालखीचे प्रस्थान कार्यक्रमाला सोमवारी पहाटे नैमित्तिक महापूजेने सुरुवात झाली. श्रीसंत तुकाराममहाराज संस्थानच्या वतीने सोहळा प्रमुख संजय मोरे, काशिनाथ मोरे, अजित मोरे यांनी शिळा मंदिरात महापूजा केली. त्यानंतर तपोनिधी नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात विश्वस्त माणिक  मोरे, विशाल  मोरे, संतोष  मोरे यांनी महापूजा केली. सकाळी दहा वाजता रामदास नाना मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीसंत तुकाराममहाराजांच्या पादुका सेवेकरी सुनील घोडेकर सराफ यांच्याकडे चकाकी देऊन मानकरी म्हसलेकर यांनी इनामदार वाड्यात आणल्या . तेथे त्यांची दिलीपमहाराज गोसावी (मोरे) इनामदार यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. 

सोहळ्यास उरला काही तासाचा अवधीइनामदार वाड्यातून पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्वी पूजेसाठी भजनी मंडपात आणल्या जाणार असून मुख्यमंदिराच्या भजनी मंडपात या पादुकांची विविध मान्यवरांच्या व शासकीय अधिकाºयांच्या उपस्थितीत पूजा होणार आहे. दुपारी अडीचला मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होईल. सोहळ्यास आता काही तासाचा अवधी शिल्लक राहिला आहे....................यंदा पाऊस लांबला आहे. शेतीची कामे अपूर्ण राहिल्याने सोहळ्याच्या गर्दीवर परिणाम झाला आहे. सोहळा पुण्याबाहेर पडल्यावर गर्दी वाढेल असा अंदाज देवस्थान ने व्यक्त केला आहे.....................सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. उकाडा ही जाणवत आहे. अधूनमधून हलक्या पावसाच्या सरीही येत आहेत. त्यामुळे भक्तीरंग गहिरा होत आहे.....................

क्षणचित्रे1) यंदाचा सोहळा ३३४ वा2) सोहळ्यात 314 दिंड्याचा सहभाग3) विठ्ठल मंदिर परिसरात आरोग्य विभागातर्फे स्वच्छता.४)  सुरक्षिततेसाठी छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही ची नजर.5) पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त6)  महिला आयोगाच्या वतीने यंदा वारीत सहभागी महिलांना सॅनिटरी नॅपकीन. 7) निर्मल आणि हरित वारी. वारीमार्गावर वृक्षारोपण. 8) विविध वृत्तवाहिन्या,  माध्यमातर्फे सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण.9) वाहतुकीचे नियोजन.

 

टॅग्स :dehuदेहूsant tukaram palkhiसंत तुकाराम पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Wariपंढरपूर वारी