मुंबई : नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड या संस्थेने अवांतर वाचनासाठी साहित्याचे ‘ब्रेल’ लिपीत रूपांतर करण्याचा उपक्रम हाती घेतला. गेल्या काही वर्षापासून लोककथा संग्रह, शब्दकोश, रागबोध, पर्यावरण आणि बालसंस्कार अशा विविध विषयांवरील पुस्तकांचे ब्रेल लिपीत रूपांतर केले. ही पुस्तके देशातील अंध विद्याथ्र्यासाठी कार्य करणा:या संस्थांना विनामूल्य उपलब्धही करून दिली. त्यानंतर आता आषाढीचा मुहूर्त साधून ‘तुकारामांची गाथा’ ब्रेल लिपीत रूपांतरित केली आहे.
संत तुकाराम महाराजप्रणीत तुकारामांची गाथा हा ग्रंथ नॅब ब्रेल प्रेसचे व्यवस्थापक यांनी पुढाकार घेऊन ब्रेल लिपीत रूपांतरित केला आहे. त्या ग्रंथावर आवश्यक ते संस्कार करून सहा भागांमध्ये हा ग्रंथ उपलब्ध करण्यात आला आहे. तुकाराम गाथा सहा भागांत विभागली असून, त्याची एकूण पृष्ठसंख्या 1,257 एवढी आहे. यामध्ये तुकाराम महाराजांचे सर्व अभंग समाविष्ट केलेले आहेत.
आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर या ग्रंथाचे लोकार्पण होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या 1क् दृष्टिहीन व्यक्तींमध्ये त्याचे विनामूल्य वितरण केले जाईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणो म्हणून लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या साधना वङो उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
दृष्टिहीनांचे कीर्तन सादरीकरण : आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर होणा:या या कार्यक्रमाचे औचित्य साधून काही दृष्टिहीन व्यक्ती ‘तुकाराम महाराजांचे जीवनकार्य व तुकाराम गाथेची महती’ यावर कीर्तन सादर करणार आहेत. दृष्टी नसूनही आपल्या भक्तांना तितक्याच विश्वासाने आपला भासणारा ‘विठ्ठल’ या वेळी दृष्टिहीनांच्या कीर्तनातून पाहता येईल.