अभिजित कोळपे - वरवंड
पिठलंभाकरीचा आस्वाद अन् विठूनामाच्या अखंड गजरात विविध शाळांतील मुलींनी दोन किमीच्या मार्गावर स्व:खर्चातून काढलेली आकर्षक स्वागत रांगोळी; तसेच यवतचे ग्रामदैवत भैरवनाथ, भांडगावचे रोकडोबानाथ, बोरीपार्धीचे बोरमलनाथ या नाथपंथीय नाथांचे दर्शन घेऊन, संत तुकोबारायांची पालखी वरवंडला गोपीनाथ मंदिरात मुक्कामासाठी विसावली.
काकड आरती आणि महापूजा झाल्यानंतर, सकाळी सातच्या सुमारास यवतहून पालखी थेट दुपारच्या मुक्कामासाठी भांडगावला दाखल झाली. दुपारच्या विश्रंतीच्या काळातही ‘ज्ञानोबा. माऊली’चा गजर सुरू होता रात्री सव्वासातच्या दरम्यान पालखी मुक्कामास वरवंडला दाखल झाली. तर गुरुवारी सकाळी पालखी वरवंडहून मार्गस्थ होणार असून, रात्रीच्या मुक्कामासाठी उंडवडी गवळ्याची येथे येणार आहे.
जेजुरीत माऊली भंडा:यात नाहली
बाळासाहेब बोचरे ल्ल जेजुरी
अहं वाघ्या, स्वहं वाघ्या,
प्रेमनगरा वारी,
सावध होऊनी भजनी लागा,
देव करा कैवारी, मल्हारीची वारी माङया मल्हारीची वारी!!
हरिनामाचा जप करीत पंढरीकडे निघालेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा बुधवारी मल्हारी मरतडाच्या जेजुरी नगरीजवळ येताच वारक:यांनी मल्हारीची आळवणी करत नगरात प्रवेश केला. जेजुरीकरांनी बेलभंडा:याची उधळण करत माऊलींचे स्वागत केले.
सासवडनगरीचा निरोप, बोरावके मळ्याची न्याहरी आणि यमाई शिवरीचा दुपारचा विसावा घेऊन पालखीने पुढील वाटचाल सुरू केली. रुंद झालेला रस्ता तसेच वारक:यांची आणि वाहनांची संख्या कमी असल्याने वाटचाल सुखावह होती. मात्र कडक ऊन आणि धुळीचा प्रचंड त्रस सहन करावा लागत होता. साकुर्डे येथे घटकाभराची विश्रंती घेऊन वाटचाल सुरू करताच दुरूनच जेजुरीच्या खंडेरायाच्या गडाचे दर्शन झाले आणि पंढरीच्या वारीचा नूर मल्हारीच्या वारीमध्ये पलटला. नाचत-नाचत मल्हारीची आळवणी करत जेजुरीच्या वेशीवर पालखीचे जंगी स्वागत झाले.
आज पालखी वाल्ह्यात
जेजुरीतून निघालेला पालखी सोहळा दौंडज खिंड ओलांडून
गुरुवारी दुपारीच वाल्हे येथे मुक्कामी जाणार आहे.