शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

२३ सप्टेंबरपासून तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा

By admin | Published: August 31, 2016 7:25 PM

राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २३ ते १७

ऑनलाइन लोकमततुळजापूर, दि. 31 - राज्यासह देशातील कानाकोपऱ्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्रोत्सव २३ ते १७ आॅक्टोबर या कालावधीत होत आहे़ २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार असून, नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत़साडेतीन शक्तीपिठापैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीला ओळखले जाते. देवीचा वर्षातून दोनवेळा महोत्सव असतो. यंदाचा शारदीय नवरात्र महोत्सव २३ सप्टेंबर ते १७ आॅक्टोबर या कालावधीत पार पडणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी देवीची मंचकी निद्रा सुरू होते़ त्यानंतर ९ दिवसांनी म्हणजे १ आॅक्टोबर रोजी पहाटे देवी मंचकी निद्रेतून सिंहासनावर प्रतिष्ठान होते. दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्यात घटस्थापना करून ब्राम्हणास अनुष्ठानाची वर्णी दिली जाते. रात्री देवीचा छबीना निघतो. २ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ३ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ४ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबीना, ५ आॅक्टोबर रोजी देवीच्या नित्योपचार पुजेनंतर रथालंकार महापूजा व रात्री छबीना, ६ आॅक्टोबर रोजी ललिता पंचमी आल्याने सकाळी देवीची नित्योपचार पूजा व नंतर मूर्ती अलंकार महापूजा, रात्री छबीना, ७ आॅक्टोबर रोजी सकाळी देवीची नित्योपचार पूजा, त्यानंतर शेषशाही अलंकार महापूजा व रात्री छबीना, ८ आॅक्टोबर रोजी सकाळी नित्योपचार पूजा, भवानी अलंकार महापूजा व रात्री छबीना, ९ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा, दुर्गाष्टमी आल्याने दुपारी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा, सायंकाळी ५ वाजता वैदिक होमास व हवनास प्रारंभ होणार आहे़ तर रात्री १०.३५ वाजता पूर्णाहुतीचा विधी व नंतर रात्री छबीना निघणार आहे़ १० आॅक्टोबर रोजी नित्योपचार पूजा, महानवमी निमित्त दुपारी १२ वाजता होमावर धार्मिक विधी व घटोत्थापना होणार आहे़ रात्री नगरहून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक तर ११ आॅक्टोबर रोजी विजयादशमी दसरा उष:काली देवीची शिबीकारोहन सिमोल्लंघन होणार आहे़ त्यानंतर १५ आॅक्टोबर रोजी पाच दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर पहाटे देवीची प्रतिष्ठापना व कोजागिरी पौर्णिमा़ १६ आॅक्टोबर रोजी देवीची नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काट्यासह छबीना, १७ आॅक्टोबर रोजी सकाळी नित्योपचार पूजा व महाअन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे़