शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

‘आई राजा’च्या जयघोषात तुळजाभवानीचे सिमोल्लंघन

By admin | Published: October 11, 2016 8:38 PM

कुंकवाची उधळण करीत, आपट्या पाने वाटून संबळाच्या वद्यात आणि आई राजा उदो ऽऽ उदो ऽऽऽ चा जयघोषात मंगळवारी पहाटे श्री तुळजाभवानी देवीचा सिमोल्लंघन

ऑनलाइन लोकमततुळजापूर, दि.11 -  कुंकवाची उधळण करीत, आपट्या पाने वाटून संबळाच्या वद्यात आणि आई राजा उदो ऽऽ उदो ऽऽऽ चा जयघोषात मंगळवारी पहाटे श्री तुळजाभवानी देवीचा सीमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी हजारो भाविक सहभागी झाले होते. त्यानंतर तुळजाभवानी देवीच्या पाचदिवसीय श्रमनिद्रेस प्रारंभ झाला.तत्पूर्वी रात्री बारा वाजता अभिषेक पुजेसाठी घाट झाली व पंचामृत अभिषेकास प्रारंभ झाला. त्यानंतर रात्री दोन वाजता भोपे पुजारी व महंतांनी देवीस १०८ साड्यांचा दिंड बांधला. दरम्यान, नगरून आलेल्या पलंग व पालखीचे स्वागत मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले. शहरातील किसान चौक, आर्य चौक, महाद्वार चौक मार्गे पलंग व पालखी मंदिरात वाजत-गाजत दाखल झाल्यानंतर देवीची आरती, धुपारती व धार्मिक विधी पार पडले. यानंतर भोपे पुजाऱ्यांनी देवीची मूर्ती नगरहून आलेल्या पालखीत ठेवून ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात मंदिर प्रदक्षिणा पार पडली. दरम्यान, पिंपळपारावर पालखीस विसाव्यास ठेवण्यात आले. यावेळी मानाच्या आरत्या, नैवेद्य आदी विधी होवून देवीस आपट्याची पाने वाहण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी कुंकवाची उधळण करीत देवीचा जयघोष केला. या सीमोल्लंघनानंतर देवीमूर्तीस पालखीतून सिंहगाभाऱ्यातील नवीन पलंगावर श्रमनिद्रेसाठी ठेवण्यात आले. यापुढील पाच दिवस देवीची श्रमनिद्रा सुरू राहणार आहे. यानंतर शासकीय आरती व भोप्यांची आरती पार पडली. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, तसीलदार सुजीत नरहरे, दिलीप नाईकवाडी यांनी आरती करणाऱ्यांना श्रीफळ प्रसाद दिला़ तसेच पलंग पालखीतील पलंगे व भगत यांनाही भरपेहराव आहेर देण्यात आल्यानंतर सिमोल्लंघनाची सांगता झाली. यावेळी दोन्ही महंत, भोपी पुजारी अमर परमेश्वर, शशिकांत पाटील, संजय सोंजी, भाऊसाहेब मलबा, अतुल मलबा, मोहन पाटील, दिलीप उदाजी, सुधीर कदम, दिनेश परमेश्वर यांच्यासह पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी, किशोर गंगणे, ऋषी मगर, सुधीर रोचकरी, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक दीपाली घाडगे, पोनि राजेंद्र बोकडे, तहसीलदार दिनेश झांपले, नगरचे विजय भगत, राजू भगत, महेश भगत, सचिन भगत, पलंगवाले बाबूराव पलंगे, आनंद पलंगे, गणेश पलंगे, उमेश पलंगे यांच्यासह सेवेकरी, पुजारी, उपाध्ये, आराधी, गोंधळी व भाविक उपस्थित होते.