दीपावली म्हणजे सुख, शांती आणि समृद्धीचा सण. दीप म्हणजे दिवा आणि आवली अर्थात ओळ. दीपावलीच्या दिवशीच प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते. या दिवशी अनेक शुभ कार्ये झाल्याची वर्णने उपनिषद, पुराणात आहेत. कार्तिक अमावस्येच्या दिवशी रामचंद्र अयोध्येत परतल्याने नागरिकांनी दिव्यांची आरास केली होती. दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी प्रत्येक घरात येते, अशी आपल्या संस्कृतीत मान्यता आहे. लक्ष्मीदेवीच्या स्वागतासाठीही दिव्यांची आरास करण्याची परंपरा आहे. जीवनातील अंधार दूर करण्याची प्रार्थना दिवाळीत दिव्यांची आरास करून केली जाते. दिव्यांची आरास करण्यात गुंतलेली ही युवती इतरांप्रमाणेच दिवाळीचे मन:पूर्वक स्वागत करताना.
तमसो मा ज्योतिर्गमय
By admin | Published: October 23, 2014 12:32 AM