शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

ऑनलाइन पेपर तपासणी बंद करा; अभाविपचा भाजपला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 12:46 AM

राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता.

ठाणे : मुंबई विद्यापीठाला ऑनलाइन पेपरतपासणी प्रक्रिया राबवणे जमत नसेल, तर त्यांनी पूर्ववत ऑफलाइन प्रक्रियेकडे वळावे. मात्र, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री अनिकेत ओव्हाळ यांनी व्यक्त केले. राज्यात भाजपप्रणीत सरकार सत्तेवर असताना प्रवेशप्रक्रियेचा बोजवारा उडाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता अभाविपने आयोजित केलेल्या ५४ व्या कोकण प्रदेश अधिवेशनाच्या खुल्या अधिवेशनात ही मागणी केली. ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या गोंधळाबाबत छात्रनेत्यांनी सरकारचे लक्ष वेधले.अधिवेशनाचा दुसरा दिवस शनिवारी रंगला. दुपारी आयोजित केलेली शोभायात्रा घाणेकर नाट्यगृहापासून सुरू होऊन प्रबोधनकार ठाकरे मैदानाजवळ समाप्त झाली. त्यानंतर, या मैदानात खुले अधिवेशन पार पडले. सुरुवातीला छात्रनेते अमित ढोमसे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली. विद्यापीठाने पूर्वतयारीशिवाय केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणीचा निर्णय सामान्य विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना या आॅनलाइन तपासणीचा फटका बसला असून पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी नवीन समस्या उत्पन्न झाल्या. या साऱ्या प्रकाराचा निषेध करीत विद्यापीठाकडे प्रवेशप्रक्रि येत सुधारणा करण्याची मागणी केली. राज्यातील भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या आॅनलाइन पेपरतपासणी प्रक्रियेत घोळ होऊन विद्यार्थ्यांचे हाल झाले होते. माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना तर भाजपने विधानसभेची उमेदवारी नाकारली. ती नाकारण्याच्या अन्य अनेक कारणांबरोबर शिक्षण विभागातील गोंधळ हे कारण होते.गोव्याचे छात्रनेते किसन मंगेशकर यांनी कोकणातल्या रस्त्यांची दुर्दशा व गोव्यातील कॅसिनोच्या संख्येबद्दल मत मांडले. छात्रनेते ज्ञानेश्वर पवार यांनी सीएएचे समर्थन करत विद्यार्थ्यांना याविषयी जागरूक राहण्यास सांगितले. छात्रनेते नीरज कुरकुंडे यांनी विद्यापीठाकडे उपकेंद्राची मागणी केली. प्रदेशमंत्री प्रेरणा पवार हिनेही मत मांडले. मंचावर कोकण प्रांताध्यक्ष प्रा. मंदार भानुशे आदी उपस्थित होते.वसतिगृहांची आवश्यकताछात्रनेते निखिल जाधव यांनी विद्यापीठाच्या वसतिगृहाविषयी भाष्य केले. बाहेरून येणाºया विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आज मुंबई विद्यापीठाची केवळ १० वसतिगृहे आहेत, त्यापैकी काही वसतिगृहांत किमान सोयीसुविधा नाहीत.विद्यापीठाने अधिक संख्येने वसतिगृह बांधण्याची मागणी त्यांनी केली. यासोबतच रागिनी कुर्मी यांनी सरकारकडे मेट्रो ट्रेन प्रोजेक्ट लवकरात लवकर अमलात आणण्याबाबत सुचवले. विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासासाठी योग्य त्या सवलती देण्याची मागणी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस