शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा फॉर्म्युला १००-८०-८०...; दोन दिवसांत तोडगा काढून जागावाटप जाहीर करणार, 'या' एका गोष्टीवर एकमत नाही!
2
भाजपचे १०५ उमेदवार ठरले; काही विद्यमान आमदारांना मिळणार डच्चू!
3
भाजपाचा नेता ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश; सावंतवाडीत दीपक केसरकरांची चिंता वाढली?
4
IAS अधिकारी रानू साहू यांना अटक, 540 कोटींचा DMF घोटाळा काय?
5
15 विधानसभा उमेदवारांची नावे असलेली यादी व्हायरल; काँग्रेसने सांगितलं सत्य काय?
6
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
7
Women's T20 World Cup: ऑस्ट्रेलियाचा खेळ खल्लास; दक्षिण आफ्रिकेनं दिमाखात गाठली फायनल
8
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
9
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
10
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
11
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
12
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
13
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
14
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
15
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
16
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
17
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
18
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
19
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
20
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 

लय कुटाणा झालाय : रद्द नोटांच्या निर्णयात ऊसतोडणी कामगार होरपळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2016 1:47 AM

काळा पैसा बंद होतुय चांगलच झालं, पन लोकांच हाल झालं. पैशेच मोकळं व्हायना. लय कुटाणा झालाय, बंद पैसं मोडायंच कुठं.

बारामती : काळा पैसा बंद होतुय चांगलच झालं, पन लोकांच हाल झालं. पैशेच मोकळं व्हायना. लय कुटाणा झालाय, बंद पैसं मोडायंच कुठं. आमच्याकडं काय कसली कार्ड न्हाय आणलेली. दुकानदार नोटा घेइना. गावात असताना व्यवहार फिराफिरी झाली. आता कोनी घेइत नाही, मुकादमाकडं परत दिल्याती, पन ते दीड महिन्यांनी मिळत्यालं, अशी प्रतिक्रिया माळेगाव येथील ऊसतोडणी कामगारांनी व्यक्त केली. नोटा रद्दच्या निर्णयाचे या कामगारांनी स्वागत केले आहे.केंद्र सरकारने ५००, १००० च्या नोटांच्या बंदीनंतर जनजीवनावर परिणाम झाला आहे. सर्वसामान्यांच्या दैनंदिनीमध्ये विस्कळीतपणा आला आहे. स्थानिक नागरिक वेळ काढून त्यातून मार्ग काढत आहेत. त्यांच्याजवळ असणाऱ्या रद्द केलेल्या नोटा स्थानिकांकडून जवळच्या बँकेत, पोस्टात जमा केल्या जात आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे आधार कार्ड, पॅनकार्ड नागरिक आणत आहेत. त्यामुळे उशिरा का होईना शहरातील स्थानिकांना पैसे मिळत आहेत. मात्र, बहुतांश ऊसतोडणी बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी आले आहेत. वर्षातील पाच महिने त्यांचा मुक्काम साखर कारखाना परिसरात असतो. सुमारे २०० किमी अंतरावरून आलेल्या या कामगारांकडे इथ वास्तव्य करताना कोणतेही शासकीय कागदपत्रं नसतात. यामध्ये बँकखाते, खाते पुस्तक, आधार कार्ड, रेशनकार्डसह पॅनकार्ड येथे उपलब्ध नसते. काहींनी कार्ड गावाकडे ठेवल्याचे सांगितले.गावांकडंचच आणलेला किराणा पुरवून आजुन खातुय, पन खर्चायची अडचण झालीय.गावांकड खाती हायती. तर काहींनी मुकादमाकड पैस पाठवल्याती. पैशेच मोकळ व्हायना. लय कुटाणा झालाय, अशी प्रतिक्रिया मूळ जामखेड येथील विठ्ठल पवार यांनी माळेगाव कारखाना येथे व्यक्त केली. तर पैस मोडायचं कुठशीक ती समजना, दुकानदार पैसच घिना, सुट आण म्हणतुय, आन आमच्याकडं बी सुट न्हायत, वाड इकुन आलेल पैस तेवड वापराय घावत्यात, असे पाटोदा येथील बबन बेद्रे यांनी सांगितले. (वार्ताहर)