शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कौतुकास्पद! वडिलांच्या कष्टाचं चीज; गवंड्याचा मुलगा झाला तहसीलदार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 12:00 PM

तुषार शिंदे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 13 ते 15 जुलै 2019 दरम्यान घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यामध्ये अहमदनगरमधील पारनेर तालुक्यातील अळकुटी म्हस्केवाडी रोड बहिरोबावाडी येथील तुषार निवृत्ती शिंदे यांची तहसीलदार पदी वर्णी लागली आहे. सध्या ते सध्या चंद्रपूर नगरपरिषदेत प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 

तुषार शिंदे यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट होती. वडिलांचा बांधकाम करण्याचा व्यवसाय आहे. मात्र या सर्व परिस्थितीवर मात करत तुषार शिंदे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत बाजी मारली आहे. शिक्षण करत असताना तुषारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र त्यांनी कधी जिद्द सोडली नाही. त्यामुळे तुषारची जिद्द आणि मेहनतीचं फळ मिळल्याची भावना गावकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच तुषार यांनी मिळवलेल्या यशाने कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेमधुन तहसीलदारपदी निवड झाल्याने शिंदे कुटुंबियांची मान उंचावली असुन त्यांचे सर्वञ कौतुक करण्यात येत आहे.

अनेक परिस्थितिला तोंड दिले. अनेक  जीवनात चढ उतार आले . पण त्यांनी कधी जिद्दी सोडली नाही. आज तो तहसीलदार झाला यांचा आम्हाला व पुर्ण अळकुटीकरानां  अभिमान वाटतोय.  - निवृत्ती नथू शिंन्दे (वडील)

प्रसाद चौगुले राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण १७ संवर्गातील ४२० पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात, सर्वसाधारण वर्गवारीतून साताऱ्याचा प्रसाद बसवेश्वर चौगुले याने ५८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. 

पहिल्याच प्रयत्नात ५८८ गुण मिळवून संपूर्ण राज्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने त्याच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. साताऱ्यातील जवाहर नवोदय विद्यालयात शिकत असताना अनेक प्रशासकीय अधिकारी शाळेत येऊन मार्गदर्शन करायचे. या विद्यालयातच स्पर्धा परीक्षेचा पाया मजबूत झाला. आपणही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत जावे, ही तेव्हापासूनच इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असेही प्रसादने सांगितले.

टॅग्स :TahasildarतहसीलदारAhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र