अनिल भापकर
औरंगाबाद, दि. 26- सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांच्यामधील दुवा म्हणून ओळखले जाणारे मेसेंजर अॅप म्हणजेच टि्वटर. पूर्वी सेलिब्रिटी आणि त्यांचे चाहते यांचा थेट संवाद होत नसत, त्यामध्ये मेडिया असायचा. मात्र आता टि्वटरमुळे सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांशी थेट संवाद साधू शकतात. त्यामुळेच सेलिब्रिटीनी टि्वटर वापरायला सुरुवात केली आणि बघता बघता जगभरात टि्वटरचे करोडो फालोअर्स झाले. मात्र टि्वटरमध्ये १४० अक्षरांची मर्यादा असल्यामुळे सेलिब्रिटींना मनमोकळेपणाने आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यास अडचण येत होती. मात्र टि्वटर आता त्यांच्या युझर्सला खूश करणार आहे, त्याला कारणही तसेच आहे. आता टि्वटरमध्ये १४० अक्षरांची जी मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामध्ये युझरनेम, कोटेड ट्विट्स, फोटो आणि आणखी सोबत जोडलेला मीडिया फाईल्स आदींना वगळण्याचा निर्णय टि्वटर घेणार असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच पूर्ण १४० अक्षरांचा वापर सेलिब्रिटीना आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी करता येणार आहे.