पुणे : राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकूण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती ३ टक्क्यांनी अधिक आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३१ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे.पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसरफेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकालविद्यार्थी परीक्षेला उत्तीर्ण टक्केवारीबसलेलेदृष्टिहीन ११५२ १०९९ ९५.४०कर्णबधिर १०६२ ९५३ ८९.७४अस्थिव्यंग १५८१ १४७३ ९३.१७अध्ययन अक्षम १०७७ १०२९ ९५.५४वाढ खुंटलेले २३ २३ १००थॅलेसेमिया १४ १४ १००अॅसिड हल्ला २ २ १००मज्जातंतूचा आजार ३२ ३२ १००भाषा व वाचा दोष २१ २१ १००इतर १३९२ १३०१ ९३.४६एकूण ६३५६ ५९४७ ९३.५७क्रीडा गुणांचा लाभ (विभागनिहाय)पुणे : ३,४५८ । नागपूर : १,५७८ औरंगाबाद : १,०६१ । मुंबई : ३,४३४ लातूर : ९९२ । कोल्हापूर : २,०७४ अमरावती : १,२७२ । नाशिक : २,१४२ कोकण : ७०९
दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश, पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 2:12 AM